राजकोट IND Vs ENG :भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनं कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच 2 द्विशतके झळकावली आहेत. या जोरावर भारतानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडवर सर्वांत मोठा विजय नोंदवला आहे. भारतानं इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला आहे. या विजयात सिंहाचा वाटा असणारा जैस्वाल म्हणाला की, "कसोटी क्रिकेट कठीण' आहे. चांगली सुरुवात करण्यावर माजा विश्वास आहे.
तर मला माझे 100 टक्के योगदान द्यावे लागतील : या सामन्यानंतर जैस्वाल म्हणाला, ''कसोटी क्रिकेट कठीण आहे. मी फक्त प्रयत्न करत आहे. जेव्हा मी क्रीझवर थोडा वेळ घालवतो तेव्हा मी त्याचे मोठ्या इनिंगमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या खेळीच मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करावे लागते.'' यशस्वी जैस्वाल पुढे म्हणाला, '' सुरुवातीला मी धावा करू शकलो नाही. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक होते. तेव्हा मला वाटले की, मी धावा करू शकतो. माझी पाठ दुखायला लागली. मला ग्राऊंडमधून बाहेर जायचे नव्हते. पण वेदना खूप वाढल्यानं बाहेर पडलो. परत आल्यानंतर मात्र शेवटपर्यंत फलंदाजी केली.''