विजयवाडा: मार्गदर्शी'च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) शैलजा किरण यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे 6व्या 'जागतिक तेलुगू लेखक परिषदे'च्या ( world telugu writers conference ) उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. यावेळी त्यांना रामोजी ग्रुपचे संस्थापक पद्मविभूषण चेरुकुरी रामोजी राव यांचे तेलुगू भाषेवरील प्रेमाचं स्मरण केलं.
विजयवाडामध्ये सुरू आहे जागतिक तेलुगू लेखक परिषद- विजयवाडा येथे शनिवारपासून जागतिक तेलुगू लेखक परिषद सुरू झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात शैलजा किरण यांनी तेलुगूचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या, " तेलुगू ही देशातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथ्या तर जगात 14व्या क्रमांकावर आहे. केवळ इंग्रजीत बोलणं म्हणजे चांगले असते, असा विचार करणं चुकीचं आहे.
तेलुगू संगीत आणि भाषेचे कौतुक- जागतिक तेलुगू लेखक परिषदेला संबोधित करताना मार्गदर्शी एमडी शैलजा किरण यांनी म्हटले, " तेलुगू भाषा लोकप्रिय करण्यात कवितारामसारख्या कवींचे योगदान आहे. श्रीकृष्ण देवरायांनी तेलुगूला देशातील सर्वोत्तम भाषा म्हटलं आहे. रवींद्रनाथ टागोरांनी तेलुगू संगीत आणि भाषेचे कौतुक केलं होतं".
रामोजी रावांचे तेलुगू भाषेवर प्रेम- शैलजा किरण यांनी रामोजी ग्रुपचे संस्थापक चेरुकुरी रामोजी राव यांचं स्मरण केलं. त्यांनी म्हटलं, "रामोजी राव यांचे तेलुगू भाषा आणि तिच्याशी संबंधित राज्यांवर नितांत प्रेम होते. आम्ही सकाळी त्यांना (रामोजी राव) अभिवादन करायचो. तेव्हा तेलुगू भाषेत शुभोदयम् (गुड मॉर्निंग) म्हणायचो. ते (रामोजी राव) घरातील मुलांनी फक्त तेलुगूमध्येच बोलावे, याची विशेष काळजी घ्यायचे". शैलजा किरण यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थित लोकांना सांगितले की, "आजपासून आपण सर्वजण रामोजीरावांच्या स्मरणार्थ 'शुभोदयम्' म्हणू. तेलुगू भाषा ही आपली भाषा आहे. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची भाषा आहे. भाषेच्या विकासासाठी आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे".
'तेलुगू भाषा वाचवूया': माजी सरन्यायाधीश रमणा- भारताचे माजी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी तेलुगू भाषेचे सौंदर्य आणि महत्त्व यावर भर देत तेलुगू भाषा वाचविण्याचं आवाहन केलं. त्यांनी रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांना आदरांजली वाहिली. त्यांनी रामोजी राव यांना "तेलुगू मातेचे लाडके पुत्र" "आणि तेलुगू भाषा- परंपरा जपणारे योद्धा" म्हटले. माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रमणा म्हणाले, "रामोजीरावांनी तेलुगू संस्कृती वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. संपूर्ण तेलुगू जगाला या कार्यक्रमात त्यांची उणीव जाणवते. आपल्या भाषा आणि परंपरांचं रक्षण करूनच आपण थोरपणा प्राप्त करू शकतो हा समृद्ध वारसा लक्षात ठेवा. भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवा," असे त्यांनी आवाहन केले.
रामोजी राव तेलगू लेखकांच्या पाठीमागे उभे राहिले: बुद्ध प्रसाद म्हणाले, "कोणताही राजकीय संबंध नसलेले लेखक तेलुगू राज्यांच्या प्रगती आणि विकासासाठी कटीबद्ध आहेत. तेलुगू भाषेचे जतन करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे". बुद्ध प्रसाद यांनी रामोजी राव यांच्या तेलगू भाषेतील योगदानाबद्दल स्मरण केले. रामोजी राव यांना दुरदृष्टी होती. त्यामुळेच सार्वजनिक जीवनातून भाषा नाहीशी होऊ नये, अशी रामोजीरावांची इच्छा होती. रामोजी राव हे जागतिक तेलगू लेखकांच्या संमेलनांचे कट्टर पाठीराखे होते. २०११ मध्ये त्यांनी तेलुगू संमेलनांमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर भाषेच्या संवर्धनासाठी तेलुगू वेलुगू हे मासिकही सुरू केले". वायएसआरसीपी सरकारनं तेलुगू माध्यमाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याची त्यांनी यावेळी टीका केली. "तेलुगूवर इंग्रजीचा प्रभाव नसावा. लेखकांनी लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकण्याची जबाबदारी घ्यावी", असे बुद्ध प्रसाद यांनी आवाहन केलं.
हा अभिमानाचा क्षण-आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी एक्स मीडियात पोस्ट करत जागतिक तेलुगू लेखक परिषदेचे आयोजन तेलगू लोकांसाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं म्हटलं आहे. भावी पिढ्यांसाठी तेलुगू भाषेचे संवर्धन करणे हा कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं त्यांनी म्हटलं. तेलुगू भाषेच्या विकासात रामोजी राव यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन मुख्य त्यांचे नाव देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी पोस्टमध्ये कौतुक केले.
- जागतिक तेलुगू परिषदेचे उद्घाटन परिषदेला आमदार सुजाना चौधरी आणि बुद्ध प्रसाद, विश्व हिंदी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य यारलागड्डा लक्ष्मी प्रसाद आणि ईनाडू आंध्र प्रदेशचे संपादक एम नागेश्वर राव हे उपस्थित राहिले.
कशी आहे जागतिक तेलुगू परिषद?
- KBN कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमात जगभरातील 1,500 हून अधिक कवी, लेखक आणि भाषाप्रेमी सहभागी झाले. वर्ल्ड तेलुगू रायटर्स असोसिएशन, कृष्णा डिस्ट्रिक्ट रायटर्स असोसिएशन आणि केबीएन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानानं परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
- 800 हून अधिक भाषाप्रेमी सहभागी होणार आहेत. तसेच, एक हजाराहून अधिक प्रख्यात तेलगू कवींच्या चित्रांचे प्रदर्शन करणारे विशेष छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.
- राजकारण, कायदा, शिक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात तेलुगू भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. विशेष सत्रात माध्यमे, वृत्तपत्रे आणि प्रकाशनातील भाषेवर चर्चा होईल. विविध राज्यांतील महिला प्रतिनिधी तेलगू भाषेतील संशोधन, साहित्य, शिक्षण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानावर होणारा परिणाम याविषयी चर्चा करणार आहेत.
हेही वाचा-