नवी दिल्ली: ग्रेटर नोएडा येथील झिरो पॉइंटवर संयुक्त किसान मोर्चाकडून किसान महापंचायत आयोजित केली जाणार आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत हेदेखील या महापंचायतमध्ये सहभागी होणार आहेत. किसान महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर ( farmer protest News ) पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसान महापंचायतीच्या कार्यक्रमाला आज दुपारी बारा वाजता सुरुवात होऊ शकते. या महापंचायतीमध्ये शेतकऱ्यांना 64.7 टक्के वाढीव भरपाई, 10 टक्के निवासी भूखंड आणि 2013 च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शेतकरी नेत्यांची सुटका-तत्पूर्वी रविवारी शेतकऱ्यांनी यमुना एक्स्प्रेसवेच्या झिरो पॉईंटची पाहणी केली. यावेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते पवन खटाना यांनी सांगितले," शेतकरी आपल्या मागण्यांसाठी गौतम बुद्ध नगरमध्ये अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे, तर काही शेतकरी नेते अजूनही गौतम बुद्ध नगरच्या लुकसर तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करण्यात यावी".
पंजाब बंदची हाक- पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पंजाब बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय किसान काँग्रेसनेही (AIKC) शेतकऱ्यांच्या पंजाब बंदला पाठिंबा दिला. शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांना 13 फेब्रुवारी 2024 पासून पंजाब आणि हरियाणा दरम्यानच्या शंभू आणि खनौरी सीमा बिंदूंवर रोखण्यात आले. त्यांना दिल्लीच्या दिशेने कूच करताना सुरक्षा दलांनी रोखले होते. एसकेएम (नॉन-पॉलटिकल) आणि केएमएमच्या बॅनरखाली शेतकरी पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शंभू आणि खनौरी येथे 10 महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. 101 शेतकऱ्यांच्या गटाने 6 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी पायी दिल्लीत प्रवेश करण्याचा तीन प्रयत्न केला. मात्र, हरियाणा पोलिसांनी त्यांना राजधानीत पुढे जाऊ दिले नाही.
- 70 वर्षीय शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषण करत आहेत. डल्लेवाल यांची प्रकृती खालावल्याने पंजाबमधील सत्ताधारी आपच्या शिष्टमंडळानं गेल्या बुधवारी त्यांची भेट घेत उपचार घेण्याची विनंती केली.
हेही वाचा-