आगरतळा: कर्करोगाचा सामना करताना नीट (NEET) या वैद्यकीय पदवीच्या प्रवेश परीक्षेत त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील विद्यार्थीनीनं यश मिळविलं आहे. मधुरिमा दत्ता असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यावर असतानादेखील मधुरिमा खचून केली नाही. तिनं कर्करोगावर मात केली. त्याचबरोबर दृढनिश्चय दाखवित नीट परीक्षादेखील उत्तीर्ण झाली.
- मधुरिमा फक्त 12 वर्षांची असताना ब्रिलियंट स्टार स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत होती. तेव्हा तिला नॉन-हॉजकिन लिम्फोमा कर्करोग असल्याचं निदान झाल्यानंतर तिच्या कुटुबीयांना धक्का बसला. कर्करोगाचं निदान गेल्यानंतर मधुरिमासह तिच्या कुटुंबीयांना प्रचंड संघर्ष सहन करावा लागला.
त्या कठीण संघर्षाची आठवण करून देताना मधुरिमाची आई रत्ना दत्तानं सांगितले की, "तो काळ अत्यंत त्रासदायक होता. आम्ही उपचारासाठी मुंबईला गेलो. मधुरिमाच्या उपचारासाठी तिथे पाच वर्षे राहिलो. सुरुवातीला आम्हाला तिच्या प्रकृतीचं गांभीर्य माहीत नव्हतं. माझी मोठी मुलगी हृतिमा अभ्यासात खंड पडू नये, याकरिता तिच्या वडिलांसोबत त्रिपुरात राहिली. मुंबईत सुरुवातीला माझा भाऊ आमच्यासोबत होता. पण शेवटी मला सर्व काही करावं लागले".
उपचार करून कर्करोगावर मात-मधुरिमाला कर्करोगातून बरे करण्याकरिता केमोथेरपी, रेडिएशन आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशा उपचारपद्धतींचा वापर केला. मधुरिमाची मोठी बहीण हृतुरिमानं बोन मॅरो दोन केल्यानं उपचाराला गती मिळाली. उपचार सुरू असतानादेखील कर्करोग पुन्हा वाढत होता. पुन्हा नवीन उपचार करण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये मधुरिमाला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी एक अभूतपूर्व अमेरिकन औषध दिले. ते औषध भारतातील मुलाला पहिल्यांदाच देण्यात आले. रत्ना दत्ता सांगतात, " कर्करोगाच्या उपचारासाठी खूप मोठा आर्थिक ताण होता. अशा बिकट परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्णालयांकडून आम्हाला भक्कपणे साथ देण्यात आली."
कर्करुग्ण असूनही सोडली नाही जिद्द- कॅन्सरच्या उपचारादरम्यान अनेकदा निराशाजनक प्रसंग येत असताना मधुरिमानं डॉक्टर होण्याचं स्वप्न सोडले नाही. ती शैक्षणिक यश मिळवू शकते, असा विश्वास तिला शाळेतून मिळाला. ऑनलाइन क्लासद्वारे नीटच्या परीक्षेची चांगली तयारी केली. तिनं नीटमध्ये रँक राष्ट्रीय स्तरावर 2,79,066 आणि त्रिपुरात 295 वा रँक मिळविला आहे. मधुरिमानं नीटच्या यशाबद्दल सांगितलं, “नीट ही कोणत्याही विद्यार्थ्यासाठी आव्हानात्मक परीक्षा असते. परंतु माझ्यासाठी कर्करोगामुळे परीक्षा दुप्पट कठीण होती. अनेक वर्षांपासून उपचार केल्यामुळे माझे शरीर अशक्त झाले होते. अभ्यास करताना मला वारंवार इन्फेक्शन, खोकला आणि त्रास सहन करावा लागत होता. सर्दी आणि इतर आरोग्य समस्यासारख्या भेडसावत होत्या.
- नीटची तयारी करणाऱ्यांसाठी मधुरिमानं काय दिल्ला सल्ला- मधुरिमानं नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला. तिनं सांगितलं, "तणाव घेऊ नका. शांत राहा. तुमच्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम करण्यावर लक्ष केंद्रित करा. नीटही अभ्यासबरोबरच तुमचा संयम आणि चिकाटीची परीक्षा आहे".