महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मसुरी अपघात : कार दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू, देहराडूनच्या महाविद्यालयात शिकत होते तरुण - Road Accident In Mussoorie - ROAD ACCIDENT IN MUSSOORIE

Road Accident In Mussoorie : मसुरीला फिरायला गेलेल्या देडराडून इथल्या आयएमएस महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांचा कार दरीत कोसळून मृत्यू झाला. ही घटना मसुरी देहरादून महामार्गावर चुनाखानजवळ घडली.

Road Accident In Mussoorie
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 1:47 PM IST

देहराडून Road Accident In Mussoorie : मसुरी देहराडून महामार्गावर कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मसुरी देहराडून महामार्गावरील चुनाखानजवळ घडली. या घटनेत देहराडूनच्या आयएमएस कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार तरुणांसह दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मसुरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह एसडीआरएफचं पथक दाखल झालं. बचाव पथकानं बचावकार्य केलं.

मसुरीला फिरायला गेले होते तरुण आणि तरुणी :देहराडून इथल्या आयएमएस महाविद्यालयातील चार तरुण आणि दोन तरुणी मसुरी इथं फिरायला गेले होते. यावेळी चुनाखानजवळ या तरुणांची कार अनियंत्रित झाली. कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ही कार खोल दरीत कोसळली. यावेळी कारमधील चार तरुणांचा जाग्यावरचं मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मसुरी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर मसुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू :मसुरी देहराडून महामार्गावर कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कार दरीत कोसळल्यानंतर त्यांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह एसआरडीएफच्या पथकानं बाहेर काढलं. यावेळी तरुणांचा घटनास्तळीचं मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. कारमधील दोन तरुणींना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. त्यांना 108 रुग्णावाहिकेतून देहराडून इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. तर चार तरुणांचे मृतदेह मसुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मसुरी पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

खोल दरी असल्यानं बचावकार्यात अडथळा :देहराडूनच्या आयएमएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडालीय या तरुणांची कार खोल दरीत कोसळल्यानं अग्निशमन दल, पोलीस आणि एसआरडीएफच्या पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळेच बचावपथक खोल दरीत पोहोचण्याअगोदरच त्या चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी असलेल्या तरुणींचाही रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास मसुरी पोलीस करत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. माळशेज घाटात टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Malshej Ghat Accident
  2. आमदार कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात, चिमुकलीसह सहा ठार - Akola Accident
  3. राहुड घाटात एसटी ट्रकचा भीषण अपघात ; अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू - Mumbai Agra highway accident

ABOUT THE AUTHOR

...view details