महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट; असा करा उष्णतेच्या लाटेपासून बचाव - Heatwave Prediction in India - HEATWAVE PREDICTION IN INDIA

Heatwave Prediction in India : महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा प्रचंड फटका बसला आहे. उष्णतेच्या लाटेत कसा बचाव करावा याबाबतचा हा लेख खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

Heatwave Prediction in India
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 9:36 AM IST

हैदराबाद Heatwave Prediction in India : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र दुसरीकडं मोठ्या प्रमाणात उष्णेतेची लहर नागरिकांना हैराण करुन सोडत आहे. राजकीय वातावरण गरम होत असताना उष्णतेनं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही सोमवारी हवामान बदलांबाबत मोठं भाष्य केलं होतं. "सार्वत्रिक निवडणुकाच्या तयारीत एप्रिलच्या अखेरीस भारताला अत्यंत प्रतिकूल हवामानाचा अनुभव येण्याची शक्यता आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

उष्णतेची लाट म्हणजे काय : सध्या देशभरात उष्णतेची लाट आल्याची चर्चा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा नागरिकांसह जनावरांनाही सामना करावा लागतो. उष्णतेची लाट म्हणजे सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान असते. सलग दोन दिवस तापमान 45 अंशापेक्षा जास्त असल्यास ही उष्णतेची लाट असल्याचं स्पष्ट करण्यात येते. उष्णतेचा फटका बसल्यास विविध व्याधींचा सामना करावा लागतो. यात कधी कधी उष्णतेच्या लाटेचा फटका बसल्यास बळीही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

उष्णतेच्या लाटेपासून कसा करावा बचाव :

कामाचं वेळापत्रक करा :उष्णतेच्या लाटेत घराबाहेर जाणं आवश्यक असेल, तर सकाळ आणि संध्याकाळीच काम करण्यास प्राधान्य द्या. सावलीच्या ठिकाणी वारंवार विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला उष्णतेचा फटका बसणार नाही.

  • बारा ते तीन वाजताच्या दरम्यान घराबाहेर जाण्यास टाळा. या काळात उष्णतेचा जोरदार फटका बसण्याची शक्यता असते.
  • शरीराला पाणी पुरवणारे पदार्थ खा, यामुळे शरीराचं तापमान योग्य राखलं जाईल. आहारात रसयुक्त फळं, काकडी आदींचा समावेश करा.
  • आहारात तिखट आणि तेलयुक्त पदार्थ खाणं टाळा, त्यामुळे शरीराचं तापमान वाढण्यास मदत होऊन उष्णतेचा दाह सहन करावा लागू शकतो.
  • भरपूर पाणी प्या, त्यामुळे शरीराचं तापमान योग्य पातळीवर राखलं जाईल.
  • दररोज भरपूर पाणी, फळांचा रस किंवा भाज्यांचा रस पिणं फायदेशीर ठरते. उष्णतेचा फटका टाळण्यासाठी पाण्याऐवजी इलेक्ट्रोलाइट-युक्त ड्रिंक घेणं योग्य ठरू शकते.

व्यायाम करताना घ्या काळजी :

  • उष्णतेची लाट असताना व्यायाम करताना काळजी घ्या. उष्णतेच्या लाटेत जास्त व्यायाम आणि परिश्रमाची कामं टाळा. दुपारी 12 ते 3 या दरम्यान बाहेर कामं करणं टाळा. प्रवास करताना पाणी सोबत ठेवा.
  • बाहेर काम करताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. मानेवर, हातांवर आणि चेहऱ्यावर ओलसर कपडा वापरा.
  • उष्णतेच्या लाटेत जास्त घाम येत असल्यास त्यामुळे शरीरातील खनिजं आणि मीठ काढून टाकते. त्यामुळे याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईत हाय हाय गर्मी; गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन - Maharashtra Weather Update
  2. अतिरिक्त उष्णतेमुळे बदलणाऱ्या हंगामाच्या तापमान वाढ, आंतरराष्ट्रीय स्तरावर 1.5 अंशानं तापमान वाढण्याची शक्यता
  3. रखरखत्या उन्हात 'रोमँटिक गारवा' हवाय? महाराष्ट्रातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या

ABOUT THE AUTHOR

...view details