गोपालगंज Gopalganj Police Seized Californium : गुप्त माहितीच्या आधारे गोपालगंज पोलिसांनी जिल्ह्यातील कुचायकोट पोलीस स्टेशन हद्दीतील बलथरी चेकपोस्टवर छापा टाकून 50 ग्रॅम मौल्यवान रेडिओअॅक्टिव पदार्थ कॅलिफोर्नियम जप्त केले. जप्त केलेल्या पदार्थासह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
गोपालगंज येथून 850 कोटी रुपयांचं कॅलिफोर्नियम जप्त : या संदर्भात पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी सांगितलं की, "मौल्यवान पदार्थाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुचयकोट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एक पथक तयार केलं. तयार करण्यात आलेल्या पथकानं तत्काळ छापा टाकून 50 ग्रॅम रेडिओअॅक्टिव पदार्थ कॅलिफोर्नियम जप्त केले. तसंच तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.
"कॅलिफोर्नियमच्या 1 ग्रॅमची किंमत सुमारे 17 कोटी रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या कॅलिफोर्नियमच्या 50 ग्रॅमची किंमत सुमारे 850 कोटी रुपये आहे. याचा वापर अणुभट्ट्यांमधून अणुऊर्जा निर्मितीसाठी तसंच मेंदूच्या कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारांवरील उपचारासाठीही केला जातो - स्वर्ण प्रभात, एसपी
तीन तस्करांची चौकशी सुरू : सध्या तपासासाठी अणुऊर्जा विभागाशी संपर्क साधला जात असून एफएसएलचे विशेष पथक या पदार्थाचा तपास करणार आहे. अटक करण्यात आलेल्या तस्करांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींपैकी एक छोटे लाल प्रसाद कुशीनगर, यूपीचा रहिवासी आहे. तर इतर दोन्ही आरोपी योगेंद्र साह आणि चंदन गुप्ता गोपालगंजचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
कॅलिफोर्नियम पदार्थ काय आहे?:कॅलिफोर्नियम हा एक अतिशय महाग रेडिओएक्टिव्ह पदार्थ आहे. भारतात सामान्य व्यक्ती ते विकत घेऊ शकत नाही. कॅलिफोर्नियम धातूचे चिन्ह CF आणि अणुक्रमांक 98 आहे. हा नैसर्गिक धातू नसून अमेरिकेतील प्रयोगशाळेत त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याला तयार करण्यात आलंय. हा पदार्थ 900 अंश सेल्सिअस तापमानात वितळतो.
कॅलिफोर्नियम कुठं वापरला जातो?: कॅलिफोर्नियमचा वापर औद्योगिक क्षेत्रात केला जातो. त्याच्या मदतीनं, तेलाच्या विहिरींमध्ये पाणी आणि तेलाचे थर शोधले जातात. याशिवाय, सोन्या-चांदीचा शोध आणि पोर्टेबल मेटल डिटेक्टरमध्ये याचा वापर केला जातो. कर्करोगाच्या उपचारातही याचा उपयोग होतो. वैद्यकीय क्षेत्रात, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आणि एक्सरे मशीनमध्ये याचा वापर केला जातो. तसंच कॅलिफोर्नियममध्ये असलेला न्यूट्रॉन अणुभट्ट्या सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे.
- मानवासाठी किती हानिकारक? : न्यूट्रॉन मानवी लाल रक्तपेशींचं नुकसान करू शकतात. CF-252 दीर्घकालीन वापरासाठी एक अतिशय मजबूत स्त्रोत आहे. त्यामुळं ते ताबडतोब लाल रक्तपेशी नष्ट करू शकते. यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बराच काळ याच्या संपर्कात राहिल्यास, रक्ताच्या कर्करोगाचा धोका होऊ शकतो.
हेही वाचा -
- मालकाच्या घरी डल्ला मारणारे आंतरराष्ट्रीय नेपाळी त्रिकुट जेरबंद; लाखोंचे दागिन्यासह डॉलर, युरो जप्त - Thane crime
- मेळघाटात दोन गांजा तस्करांच्या आवळल्या मुसक्या, चार किलो गांजा जप्त - ganja smuggling
- कफ सिरपची नशेसाठी आंतरराज्यीय तस्करी; एनसीबी मुंबईकडून 15 लाखांचा साठा जप्त, तिघे अटकेत - Cough Syrup Smuggling Case Mumbai