नवी दिल्ली First Session Of 18th Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएननं केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. आजपासून लोकसभा अधिवेशन 2024 ला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लोकसभेचे तालिका सभापती म्हणून भर्तृहरी महताब यांची निवड करण्यात आली. तालिका सभापती भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे चांगलेच कान टोचले. "नागरिकांना विरोधकांचा ड्रामा नाही, तर चांगल्या कामाची अपेक्षा आहे," असा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू झालेल्या 18 व्या लोकसभा अधिवेशनात खासदारकीची शपथ घेतली. "मी नरेंद्र दामोददास मोदी, ईश्वराची शपथ घेतो. विधीद्वारा स्थापित भारताचं संविधानाच्या प्रति खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवेल. मी भारताची प्रभुता आणि अखंडता कायम ठेवेल. माझ्या कर्तव्याचं श्रद्धापूर्वक निर्वहन करेल" अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली. यावेळी सभागृह फक्त मोदी मोदी मोदी अशा गगणचुंबी घोषणांनी दणाणून गेलं.
विरोधक ड्रामा न करता, चांगलं काम करतील :"देशाच्या जनतेनं आम्हाला तिसऱ्या वेळी सत्ता दिली आहे. हा खूप मोठा विजय आहे. जनतेनं आम्हाला दिलेली तिसऱ्या वेळच्या संधीबद्दल देशातील नागरिकांचे आभार, आम्ही पहिल्यापेक्षा तीन पटीनं अधिक काम करू. देशातील नागरिक विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतात. मात्र 18 लोकसभेत देशातील नागरिक विरोधकांकडून चांगली अपेक्षा करतात, त्यांच्यानुसार कार्य करतील. नागरिकांना ड्रामा, नाटकं होत राहतील, अशी अपेक्षा करत नाहीत. नागरिकांना चांगल्या जबाबदार विरोधकांची गरज आहे. विरोधक चांगलं काम करुन नागरिकांच्या इच्छा पूर्ण करतील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.