हैदराबाद :दर 30 वर्षांनी समाजात एक पिढी बदलते. त्या पीढीची विचार करण्याची पद्धत देखील बदलते. चित्रपट निर्माते याच पद्धतीला 'ट्रेंड' म्हणतात. या ट्रेंडला समजून घेऊन जे पिढीतील बदलाची सुरुवात करतात त्यांना ट्रेंडसेटर म्हणतात. अशीच कल्पना त्यावेळी तेलगू भाषेतील वृत्तपत्राबाबत मांडण्यात आली होती. याच वृत्रपत्रानं क्रांती करत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बदल घण्यात तेलगू भाषेत मोठी भूमीका निभावली. अगदी 4 हजार 500 च्या खपापासून सुरुवात करणाऱ्या 'ईनाडू' दैनिकांनं माध्यम क्षेत्रात क्रांती घडवून आणली. वेळोवेळी नवीन प्रयोग करत त्यांनी या दैनिकानं पत्रकारितेसह समाजाला दिशा देण्याचं काम केलं. याचं 'ईनाडू' दैनिकाचा आज 13 लाखांहून अधिक खप असून हे दैनिक तेलगू भाषेतील प्रथम क्रमांकाचं दैनिक आहे. 10 ऑगस्ट 2024 रोजी 'ईनाडू' आपल्या गौरवशाली प्रवासाला 50 वर्षे पूर्ण करत आहे.
इनाडूचे संस्थापक अध्यक्ष रामोजीराव (Eenadu News Paper) ईनाडूची सुरवात? : 10 ऑगस्ट 1974 रोजी विशाखापट्टणमच्या सीतमधरा भागात एक बंद शेडमध्ये या वृत्तपत्राचा जन्म झाला. या दैनिकामुळं तेलगू भाषेत माहितीची क्रांती घडवून आणली. अंधाराचे बुरखे फाडून 'ईनाडू' रोज सकाळी वाचकांसाठी विविध बातम्या देत असे. प्रादेशिक वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला दैनिकाचा प्रवास सर्वोच्च प्रसारासह शिखरावर आज पोहोचला. त्यामुळं इनाडू दैनिक आज अभिमानानं सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे.
"50 वर्षांच्या ईनाडूच्या प्रवासात भूमिका निभावणं तसंच 35 वर्षे संस्थेत जबाबदारीनं काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या अध्यक्षांनी कंपनीत लावलेल्या शिस्तीमुळं हे शक्य झालंय, असं मला वाटतं. कारण संस्थेतील इतर सर्वांप्रमाणेच माझीही शिस्त असून हा प्रवास आजही सुरू आहे. - किरण, व्यवस्थापकीय संचालक, ईनाडू.
शब्दांचे जादूगार रामोजी राव! : इनाडूचे सर्वेसर्वा रामोजी रावयांना मासिक सुरू करण्याची कल्पना नव्हती. हा त्यांचा एक अनपेक्षित प्रवास होता. एका अनौपचारिक परिस्थितीतून "ईनाडू" दैनिकाची उत्पत्ती झाली. रामोजी राव यांचे टी. रामचंद्र राव नावाचे एक परिचित जाहिरात क्षेत्रात काम करत होते. त्यांना पाहून रामोजीरावांना जाहिरातींशी संबंधित तंत्र शिकण्याची आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामोजी राव दिल्लीतील एका जाहिरात संस्थेत रुजू झाले. तिथं तीन वर्षे काम केल्यानंतर ते हैदराबादला परत आले. त्यावेळी गोयंका यांच्या आंध्र प्रभाचा तेलुगू माध्यमांमध्ये सर्वाधिक प्रसार होता. त्यामुळं तेलगू वृत्तपत्रे मागं कशी?, असा प्रश्न रामोजीरावांना पडला. त्यातून दैनिक वृत्तपत्र काढण्याची त्यांना कल्पना सुचली. त्यांच्या याच कल्पनेतून 'इनाडू'चा जन्म झाला.
अनेक अडचणीचा सामना : त्यावेळी वृत्तपत्र कोठून सुरू करावं?, त्याची सुरुवात कशी करावी? असे अनेक प्रश्न होते. त्यावेळी सर्व तेलुगू वृत्तपत्रे विजयवाड्यातून प्रसिद्ध होत असत. तिंथून त्यांना इतर ठिकाणी नेण्यात आलं. विजयवाडाहून रेल्वेनं वर्तमानपत्रं विशाखापट्टणमला पाठवावी लागत होती. रेल्वेनं वर्तमानपत्रे येऊन वाचकांपर्यंत पोहोचायला जवळपास दुपार होत होती. त्यामुळं हिच वृत्तपत्र संध्याकाळी उत्तर आंध्रच्या इतर भागात पोहोचायचे. त्यामुळं विजयवाड्यात वृत्तपत्र सुरू केल्यास इतरांमध्ये आपल्याला देखील वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागेल. इतरांप्रमाणे आपण देखील त्यांचे स्पर्धक होऊ. याशिवाय आपल्या वृत्तपत्रात विशेष काय असेल? असे अनेक प्रश्न त्यावेळी रामोजी रावांना सतावत होते. त्यामुळं त्यांनी पहिलं पाऊल विशाखापट्टणममध्ये टाकण्याचं ठरवलं. जिथं त्यावेळी कोणतंही वृत्तपत्र छापलं जात नव्हतं. चीनची युद्धनीती ‘नो मॅन्स लँड’ सिद्धांतही या निर्णयामागं प्रेरणादायी असल्याचं रामोजी राव म्हणत.
एक धाडसी सुरुवात :विशाखापट्टणममध्ये मासिक सुरू करणं धाडसाचा निर्यण होता. तसंच मासिकाचं नाव देखील निवडण्याचं आव्हान होतं. कारण त्या काळी सर्व तेलुगू वृत्तपत्रांच्या नावात 'आंध्र' शब्द होता. आंध्र पत्रिका, आंध्र प्रभा, आंध्र जनता, आंध्र ज्योती, विसलंध्र अशी त्यावेळी वृत्तपत्राची नावं होती. अशा परिस्थितीत आंध्र शब्दाशिवाय वृत्तपत्राला नाव देणं धाडसाचं होतं. रामोजीरावांना कोणाचीही नक्कल करण्याची सवय नव्हती. त्यामुळं त्यांनी या वृत्तपत्राला ईनाडू नाव देण्याचं ठरवलं. 'नाडू'चे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे 'स्थान आणि दिवस'. त्यामुळं याच नावानं एक मजबूत प्रादेशिक वृत्तापत्राची सुरवात झाली.
10 ऑगस्ट 1974 निघाला पहिला अकं : त्यासाठी विशाखापट्टणमच्या सीतमधरा भागातील नक्कावानीपालम येथे त्यावेळी बंद असलेला स्टुडिओ भाडेतत्त्वावर घेण्यात आला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली. वृत्तपत्र छापण्यासाठी, नवहिंद टाईम्स, मुंबई येथून सेकंड-हँड डुप्लेक्स फ्लॅटबेड रोटरी प्रिंटिंग प्रेस विकत घेतल्या गेलं. त्यावेळी त्याची किंमत एक लाख पाच हजार रुपये होती. सुमारे पाच-सहा दिवस अगोदर ट्रायल रन करण्यात आलं. ठरल्याप्रमाणे सगळी तयारी केली. 9 ऑगस्ट 1974 च्या संध्याकाळी रामोजी राव यांनी एका कामगाराला ईनाडूची पहिली आवृत्ती छापण्यासाठी स्विच ऑन करायला सांगितलं. त्यामुळं इनाडू दैनिकाचा पहिला अकं 10 ऑगस्ट 1974 रोजी सकाळी विशाखापट्टणममधील लोकांच्या घराघरात पोहचला.
"ईनाडू तुमचं वृत्तपत्र आहे, असं अध्यक्ष रामोजी राव म्हणायचे. त्यामुळं त्यांनी वाचकांच्या हृदयात जागा निर्माण केली. हीच ईनाडूची कीर्ती, प्रगती आहे. त्यामुळं ईनाडू वृत्तपत्र तेलुगू कुटुंबांतील महत्त्वाचा भाग बनला आहे. ईनाडूचे लाखो वाचक आहेत. ज्यांना ईनाडूच्या बातम्यांवर विश्वास आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही चॅनेलवर बातम्या आल्यास, ती बातमी खरी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लोक ईटीव्हीच्या बातम्यांवर विश्वास ठेवतात." - एम. नागेश्वर राव, ईनाडू, आंध्र प्रदेशचे संपादक.
"ईनाडूच्या आगमनापूर्वी, बरेच संस्कृत शब्द वापरले जात होते. लोकांना ती भाषा समजत नव्हती. त्यामुळं वाचक वर्तमानपत्रांपासून दूर राहत होते. सहज समजण्यायोग्य सामान्य शब्दांचा वापर करून बदल घडवून आणण्याचं श्रेय रामोजी रावांना जातं. त्यामुळं साध्या तसंच सोप्या भाषेत बातम्या लोकांपर्यंत पोहचल्या".- डीएन प्रसाद, ईनाडू, तेलंगणाचे संपादक
1975 ला हैदराबाद आवृत्तीची सुरुवात : 1974 पर्यंत आंध्र प्रदेशची एकत्रित लोकसंख्या एक कोटी होती. त्यावेळी तेलुगू दैनिकांचं संचलन अवघं दोन लाख होतं. त्यावेळी रामोजी रावांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं की, उर्वरित 90 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. 17 डिसेंबर 1975 रोजी हैदराबादमध्ये ईनाडूच्या आवृत्तीची सुरुवात झाली. या हैदराबाद आवृत्तीची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री जलगम वेंगलाराव, उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश अवुला सांबशिवराव आणि तेलुगू अभिनेते एनटीआर, एएनआर यांच्या उपस्थितीत झाली.
तेलगू भाषेतील सर्वाधीक खपाचं वृत्तपत्र : मे, 1978 ला तत्कालीन राज्यपाल शारदा मुखर्जी यांच्या हस्ते ईनाडूच्या विजयवाडा आवृत्तीची मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली. विजयवाडा आवृत्तीनं सुरुवातीपासूनच एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. आंध्र प्रभाला मागं टाकून इनाडूनं आघाडीच्या तेलगू दैनिकामध्ये स्थान निर्माण केलं. ईनाडू 46 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. तिरुपती येथे चौथे युनिट सुरू करण्यात आलंय. 30 जून 2002 रोजी एकाच दिवसात सात युनिट्स लाँच करण्यात आले. ज्यानं एक नवीन ट्रेंड सेट केला. कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्राच्या राजधानीतही नवीन आवृत्त्या निघाल्या आहेत. 11 सप्टेंबर 2002 रोजी रामोजी राव यांनी दिल्ली आवृत्ती सुरू केली. एकूण 23 आवृत्त्यांसह, Eenadu नं केवळ विस्तार केला नाही, तर तेलगू लोकांच्या ह्रदयात आदराचं स्थान निर्माण केलं. 1974 मध्ये ईनाडूचा प्रारंभिक खप केवळ 4 हजार 500 होता. 50 वर्षांच्या अस्तित्वात आता इनाडूचा 13 लाखांहून अधिक खप आहे. तेलगू भाषेतील सर्वात मोठं दैनिक म्हणून इनाडूला ओळखलं जातं.