महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला: बस आणि कारच्या भीषण अपघातात 10 भाविक ठार - DEVOTEES CAR COLLIDED WITH BUS

छत्तीगडमधूल कुंभमेळ्याला प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. भाविकांची कार आणि बसचा भीषण अपघात होऊन तब्बल 10 भाविक ठार झाले.

Devotees Car Collided With Bus
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 11:02 AM IST

लखनऊ :कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची कार आणि बसच्या भीषण अपघातात तब्बल 10 भाविकांवर काळानं घाला घातला. ही घटना प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर मेजा परिसरात शनिवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात 12 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. घटनास्थळावर जखमी भाविकांच्या आक्रोशानं आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत बचावकार्य केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

कुंभमेळ्याला जात होते भाविक :छत्तीसगडमधील भाविक प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरुन बोलेरो गाडीनं कुंभमेळ्याला जात होते. यादरम्यान मेजा परिसरात मध्य प्रदेशहून येणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बस आणि कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 12 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. या अपघातात बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या 10 भाविकांचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणारे काही जण जखमीही झाले आहेत. या अपघातात बोलेरो पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढलं.

बोलेरोतील भाविक छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील : पोलिसांनी जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी 10 जणांना तपासून मृत घोषित केलं. अपघातानंतर प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा आणि जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मंधाड यांनीही घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. अपघातात मृत्यू झालेले बोलेरोमधील भाविक हे छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रहिवासी होते. तर अपघातात जखमी झालेले बसमधील प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

हेही वाचा :

  1. महाकुंभवरून येताना महाराष्ट्रातील भाविकांच्या कारची ट्रकला धडक, दोघांचा मृत्यू, अलिबागचे होते रहिवासी
  2. 'माऊली'च्या दर्शनाला जाताना काळाचा घाला; मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू, तर 15 जखमी
  3. गोव्याहून संभाजीनगरकडे निघालेल्या बसचा कोल्हापुरात भीषण अपघात, 1 जण ठार, तर 30 हून अधिक जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details