बंगळुरू Mall Denied Entry To Farmer :शेतकरी धोतर नेसून मॉलमध्ये गेल्यानंतर मॉलमधील कर्मचाऱ्यानं त्यांना मॉलच्या बाहेर काढलं. धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलबाहेर काढल्याच्या या प्रकारानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे बीबीएमपीनं बंगळुरूतील जीटी मॉलला नोटीस पाठवली. बीबीएमपीची नोटीस धडकताच मॉल प्रशासनानं मॉलला टाळं ठोकलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा अपमान केल्याची मोठी किंमत मॉल प्रशासनाला चुकवावी लागली. विशेष म्हणजे शेतकऱ्याचा अपमान केल्याप्रकरणी जीटी मॉल प्रशासनानं माफी मागितली आहे.
धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमधून काढलं बाहेर; बीबीएमपीच्या नोटीसनंतर प्रशासनानं मॉलला ठोकलं टाळं - Mall Denied Entry To Farmer - MALL DENIED ENTRY TO FARMER
Mall Denied Entry To Farmer : धोतर नेसून मॉलमध्ये गेलेल्या शेतकऱ्याला सुरक्षा रक्षकानं बाहेर काढलं. त्यामुळे बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी बीबीएमपीनं नोटीस बजावल्यानंतर मॉलच्या मालकानं शेतकऱ्याची माफी मागितली. इतकंच नाही, तर मॉलला टाळं ठोकण्यात आलं.
Published : Jul 19, 2024, 8:21 AM IST
काय आहे प्रकरण :बंगळुरूतील मगडी रोडवर असलेल्या जीटी मॉलमध्ये बुधवारी हावेरी इथले शेतकरी धोतर नेसून गेले होते. यावेळी सुरक्षा रक्षकानं त्यांना अडवत हाकलून लावलं होतं. केवळ धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारुन हाकलून दिल्यानं मोठी खळबळ उडाली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही यावर मोठी चर्चा रंगली. त्यानंतर बीबीएमपीनं मॉलला नोटीस पाठवून याबाबतचा खुलासा मागितला. मात्र बीबीएमपीची नोटीस मिळाल्यानंतर जीटी मॉल स्वेच्छेनं बंद करण्यात आला.
मॉल प्रशासनानं शेतकऱ्याची मागितली माफी :केवळ धोतर नेसून आलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारुन त्यांना काडून दिल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. त्यामुळे जीटी मॉलचे मालक आनंद यांचा मुलगा प्रशांत यांनी याबाबत माहिती दिली "बुधवारी वाईट घटना घडली असून नवीन कर्मचाऱ्यांची चुकीमुळे शेतकऱ्याचा अपमान झाला आहे. मॉल मालक म्हणून मी या घटनेबद्दल मी माफी मागतो. आम्ही शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबत करत आहोत. आमच्या वडिलांनी शेतकऱ्याशी चर्चा केली. बीबीएमपीनं एक कोटी 70 लाख रुपये थकबाकीची नोटीस दिली. त्यानुसार आम्ही पुढील सूचना मिळेपर्यंत मॉल बंद करत आहोत. आम्ही वैयक्तिकरित्या शोतकऱ्याची माफी मागतो. आगामी दोन किंवा तीन दिवसात या प्रकरणावर तोडगा काढण्यात येईल. महसूल विभागानं मालमत्ता कराच्या थकबाकीबाबत नोटीस बजावली आहे. आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. आमची चूक आहे. त्यासाठी आम्ही स्वतःला मॉल बंद करत आहोत. मात्र सात दिवस मॉल बंद होईल, याची कल्पना नाही, असंही त्यांनी यावेळी माहिती दिली.