नवी दिल्लीPooja Khedkar : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. UPSC नं (लोकसेवा आयोग) पोलिसांकडं तक्रार दाखल केली असून खेडकर यांनी नियमांनुसार परीक्षा दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी खोटी कागदपत्र देऊन आयोगाची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे. खेडकर यांनी त्यांच्या वडिलांचं नाव, आईचं नाव त्यांचा फोटो/स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबर पत्ता देखील बदलल्याचं म्हटलं आहे.
परीक्षेचे नियम बसवले धाब्यावर :पूजा खेडकर तसंच त्यांच्या आई मनोरमा, वडील दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची सविस्तर सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी आपलं नाव, वडिलांचं तसंच आईचं नाव, त्यांची छायाचित्र/स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण केली. तसंच त्यांनी परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं तपासात समोर आलं आहे.