मुंबई :राज्यासह देशभरात 'ख्रिसमस' (Christmas 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस सण खूप खास आहे. ख्रिसमसच्या दिवशी मित्र-मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात. ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्रीसह आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. भारतात गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळत आहे. माऊंट मेरी चर्च हे शहरातील सर्वात जुने चर्च आहे. ख्रिसमसच्या काळात येथे लोक मोठ्या संख्येनं प्रार्थना करण्यासाठी जमतात.
दिल्लीतील गोल दख्खाना येथे असलेल्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्च रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. चर्चसमोर विशाल ख्रिसमस ट्री लावण्यात आला आहे, जो दिल्लीतील जनतेचं लक्ष वेधून घेत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठ्या संख्येनं लोक चर्चला भेट देत आहेत.
पुद्दुचेरीमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं सेक्रेड हार्ट बॅसिलिका चर्चमध्ये मध्यरात्री सामूहिक प्रार्थनेसाठी लोक जमले होते.