ETV Bharat / state

आनंदाची बातमी! लालपरी होणार हायटेक, आता प्रवाशांना एसटीचे LIVE लोकेशन समजणार - ST GPS SYSTEM FROM MARCH 2025

प्रवाशांना आता एसटीचं लाईव्ह लोकेशन समजणार आहे. यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासदेखील जलदगतीने आणि सुखकर होणार असल्याचं बोललं जातंय.

Lalpari will be high-tech
लालपरी होणार हायटेक (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2025, 4:37 PM IST

Updated : Jan 13, 2025, 7:37 PM IST

मुंबई : गाव-खेड्यात अन् ग्रामीण भागात एसटी अर्थात लालपरी ही लोकांची जीवनवाहिनी समजली जाते. गावातील लोकांना प्रवासासाठी एसटीचा मोठा आधार असतो. त्यामुळं प्रवासाचं मोठं साधन म्हणून लालपरी एसटीकडे पाहिलं जातं. दरम्यान, एसटी डेपोत, आगारात एसटीची वाट बघत प्रवाशांना तासनतास थांबावं लागतं. एसटी कधी येणार हे माहीत नसल्यामुळं प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता एसटी, लालपरी हळूहळू कात टाकत आहे. प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाकडून लवकरच अद्ययावत प्रणाली म्हणजे एसटीमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता एसटीचं लाईव्ह लोकेशन समजणार आहे. यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासदेखील जलदगतीने आणि सुखकर होणार असल्याचं बोललं जातंय.

तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली? : दरम्यान, राज्य परिवहन महामंडळानं एसटीमध्ये अद्ययावत प्रणाली आणण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे दळवळणाची साधनं वाढली असताना दुसरीकडे काही राज्यातील अनेक जिल्ह्यांत लालपरीच्या फेऱ्या मात्र मर्यादित आहेत. त्यामुळं प्रवाशांना एसटी कधी येणार? किती वाजता येणार? हे माहीत नसते. परिणामी बऱ्याचदा प्रवाशांना एसटीची वाट बघत तासनतास ताटकळत राहावे लागते. मात्र आता राज्य परिवहन महामंडळातील एसटीच्या सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (VTS) बसविले जाणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार असून, तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली? गाडीचा मार्ग, एसटीची वेळ, एसटी आगारातील थांब्याची वेळ, थांब्याचे ठिकाण, एसटी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती प्रवाशांच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. यामुळं प्रवाशांचा प्रवास अगदी सोप्पा होणार आहे.

passengers will be able to know the LIVE location of ST
आता प्रवाशांना एसटीचे LIVE लोकेशन समजणार (Source- ETV Bharat)

जीपीएस सिस्टीम कधी सुरू होणार? : "सध्या जीपीएस सिस्टीम राज्य परिवहन एसटी महामंडळमध्ये अंतर्गत सुरू आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी ही जीपीएस सिस्टीम प्रणाली हाताळत आहेत. मात्र ही सेवा पुढील काही दिवसांत प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे", अशी माहिती एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. तसेच जीपीएस सिस्टीमचे काम 'रोस मार्टा' कंपनीला देण्यात आले असून, त्या कंपनीनं आता रूट मॅपिंग केलंय. दरम्यान, या प्रणालीचं सिस्टीममध्ये इंटिग्रेशनही पूर्ण झालंय. सध्या या पॅटर्नमधील काही बदलाचे काम सुरू आहे. दरम्यान, राज्यातील 15,000 हजार एसटीमध्ये ही सिस्टीम बसविण्यात येणार असून, ही सिस्टीम मार्च महिन्यात प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती या प्रणालीचे मुख्य अधिकारी नितीन मैनाद यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. दरम्यान, ही जीपीएस सिस्टीम कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे याचे काम सुरू आहे. तसेच या सर्व प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील आगारात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत तोडगा, वाचा 'किती' दिली पगारवाढ - ST employees called off strike
  2. एसटी कर्मचारी संपामुळे १५ कोटींचे नुकसान, मुख्यमंत्री आज काढणार तोडगा - ST Bus strike second day

Last Updated : Jan 13, 2025, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.