महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नीट पेपर लिक प्रकरण : सीबीआयनं रिम्समधून एका विद्यार्थिनीला घेतलं ताब्यात - NEET Paper Leak Case - NEET PAPER LEAK CASE

NEET Paper Leak Case : नीट पेपर लिक प्रकरणी सीबीआयनं रिम्समधून एका विद्यार्थिनीला ताब्यात घेतलं आहे. ही विद्यार्थिनी सॉल्व्हर गँगमध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासह सीबीआनं पाटण्यामधून चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

NEET Paper Leak Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 10:24 AM IST

रांची NEET Paper Leak Case :नीट पेपर लिक प्रकरणात लातूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अटक केल्यामुळे मोठी खळबळ उडाली. नीट पेपर लिक प्रकरणाची पाळंमुळं देशपातळीवर रुजलेली असल्यानं हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं. सीबीआयनं नीट पेपर लिक प्रकरणात देशपातळीवर मोठी छापेमारी केली. सीबीआयनं आता झारखंडमधील रांची इथल्या रिम्स अर्थात Rajendra Institute of Medical Sciences मध्ये कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकानं रिम्समधून प्रथम वर्षाच्या सुरभी नावाच्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतलं आहे. या विद्यार्थिनीची कसून चौकशी सुरू असून ही विद्यार्थिनी सॉल्व्हर गँगमध्ये सहभागी असल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सॉल्व्हर गँगमध्ये विद्यार्थिनीचा सहभाग असल्याचा संशय :NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI पथकानं रांचीत मोठी कारवाई केली. रांची इथल्या RIMS मधील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. ही विद्यार्थिनी सॉल्व्हर गँगमध्ये सहभागी असल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे. सीबीआयच्या पथकानं गुरुवारी रात्री उशिरा रिम्स हॉस्टेलवर छापा टाकला. सीबीआयचं पथक RIMS च्या मुलींच्या वसतिगृहात धडकल्यानंतर विद्यार्थिनीला सोबत घेऊन गेली. सध्या सीबीआय या विद्यार्थिनीची रांचीमध्येच चौकशी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सॉल्व्हर टोळीत सहभागी असल्याची माहिती आली पुढं :सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेली विद्यार्थिनी ही झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. NEET पेपर लीक प्रकरणात ती विद्यार्थिनी सॉल्व्हर टोळीत सहभागी असल्याची माहिती सीबीआयला मिळाली. पाटणा इथल्या अटकेनंतर या विद्यार्थिनीचं नावही समोर आलं आहे. या विद्यार्थिनीनंही सॉल्व्हर गँगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीबीआयनं पाटण्यात चार विद्यार्थ्यांना ठोकल्या बेड्या :बुधवारी सीबीआयनं पाटणा एम्समधून तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पाटण्यातील चौथा विद्यार्थी सीबीआयसमोर हजर झाला. सीबीआयच्या पथकानं त्यांची जवळपास 9 तास चौकशी केली. चौकशीनंतर सर्वांना सीबीआयनं अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं या विद्यार्थ्यांना चार दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयनं अटक केलेले विद्यार्थी सॉल्व्हर गँगशी कनेक्टेड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. उमेदवारांची ओळख उघड न करता NEET चे निकाल प्रकाशित करा; सर्वोच्च न्यायालयाचे 'NTA' ला आदेश - NEET UG Paper Leak Case
  2. आणखी एक 'नीट' घोळ; फेरपरीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले विद्यार्थीनीचे गुण - NEET Exam Scam
  3. एनटीए, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं शपथपत्र; 'ते' व्हिडिओ बनावट असल्याचा एनटीएचा दावा - NEET Paper Leak Case

ABOUT THE AUTHOR

...view details