महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत न्याय यात्रेत राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल, काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान बॅरिकेड तोडण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल आसाममध्ये राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे काँग्रेसनं भाजपावर कडाडून टीका केली आहे.

By PTI

Published : Jan 24, 2024, 7:01 AM IST

Updated : Jan 24, 2024, 11:33 AM IST

Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra

गुवाहाटी Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममधील पोलिसांनी एफआयआर नोंदवलाय. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिलीय. ते म्हणाले, "काँग्रेस सदस्यांनी हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरुद्ध कलम 120 (बी) 143/147/188 तसंच 283/427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय."

गुवाहाटीत यात्रेला प्रवेश नाकारला : पीडीपीपी कायद्यातील कलम 353 (लोकसेवकावर हल्ला), कलम 332 (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), आणि कलम 333 ची (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे) नोंद करण्यात आलीय. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी मंगळवारी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले होते. यानंतर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "डीजीपींना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

सरमा यांनी गुन्हा नोंदविण्याच्या दिले होते आदेश: “मी आसाम पोलीस महासंचालकांना नेते राहुल गांधी यांच्यावर जमावाला भडकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (पूर्वीचं ट्विटर) सांगितलं. पुढं ते म्हणाले, “ही (हिंसा) आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आम्ही शांतताप्रिय राज्य आहोत. असे नक्षलवादी डावपेच आपल्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळं आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यामुळं गुवाहाटीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली."

राहुल गांधींनी दिलं उत्तर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "आसामचे मुख्यमंत्री जे काही करत आहेत, त्याचा फायदा यात्रेला होत आहे. जी प्रसिद्धी आम्हाला मिळत नाही. ती प्रसिद्धी आम्हाला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री आसामचे मंत्री आणि कदाचित त्यांचे गृहमंत्री अमित शाह आम्हाला मदत करत आहेत. आज आसाममध्ये ही यात्रा हा मुख्य मुद्दा बनलाय."

हेही वाचा :

  1. ईशान्य भारताच्या विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
  2. राहुल गांधींना आसाममध्ये मंदिरात जाण्यापासून रोखलं, काय आहे कारण; वाचा सविस्तर
Last Updated : Jan 24, 2024, 11:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details