बंगळुरू Mahalakshmi Murder Suspect Dies : बंगळुरुमधील महालक्ष्मी हत्याकांडाला वेगळंच वळण लागलंय. महालक्ष्मीच्या हत्येचा संशयिताचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. महालक्ष्मीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या या घटनेतील मुख्य संशयितानं ओडिशात आत्महत्या केल्याचं समोर आलंय. मुक्तिराजन प्रताप रॉय असे मुख्य संशयिताचं नाव आहे. दरम्यान, महालक्ष्मी हत्याकांडप्रकरणी यापूर्वी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
संशयित आरोपीच्या मृतदेहानं खळबळ : ओडिशातील भद्रक भागात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृताची ओळख मुक्तिराजन प्रताप रॉय अशी सांगितली. त्यापूर्वी महालक्ष्मी खून प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी मुक्तिराजन प्रताप रॉय असल्याचं स्पष्ट केलं होतं. पोलिसांच्या दाव्यानुसार महालक्ष्मीचा खून झाला तेव्हापासून आरोपी फरार होता.
पतीपासून राहत होती वेगळी :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी वैयक्तिक कारणास्तव पती हुकुमसिंग राणा आणि मुलापासून वेगळी राहत होती. गेल्या पाच महिन्यांपासून ती भाड्याच्या घरात वेगळी राहत होती. तरुणीची आई आणि कुटुंबीय घरी आले असता तिचा फोन बंद असल्यानं त्यांना संशय आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, तरुणीची हत्या काही दिवसांपूर्वीच झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. संशयित मारेकऱ्यानं मृतदेहाचे 32 तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. तसंच दुर्गंध येऊ नये, म्हणून आरोपीनं मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी केली. त्यानंतर घराला कुलूप लावून पळ काढला.
सकाळी जायची अन् रात्री घरी यायची :स्थानिक रहिवासी मेरीनं या घटनेबाबत सांगितलं होतं की, "मृत तरूणीसोबत नुकतीच आपली मैत्री झाली होती. ती घरी एकटीच राहत होती. तिचा मोठा भाऊ तिच्यासोबत काही दिवसांसाठी राहायला आला होता. तो गेल्यानंतर ती घरात एकटीच राहत होती. रोज सकाळी ती 9.30 वाजता घरून निघायची. त्यानंतर रात्री 10 नंतर घरी परतायची. आज सकाळच्या दरम्यान तिची आई आणि मोठी बहीण आली होती. घरात गेल्यावर त्यांना दुर्गंध येऊ लागला. आई आणि बहिणीनं फ्रीज उघडल्यावर त्यांना मृतदेहाचे तुकडे दिसले."
हेही वाचा -
- 29 वर्षीय तरूणीची हत्या, मृतदेहाचे 32 तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये - Bengaluru Girl Murder Case