मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ( PM Modi Mumbai Visit) आले आहेत. पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " पहिल्यांदाच एक विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडी एकत्रितपणे भारतीय नौदलात कमिशन केली जात आहे. भारताला जगात विश्वसनीय आणि जबाबदार देश म्हणून ओळखलं जात आहे. भारत विस्तारवादापेक्षा विकासाच्या भावनेवर काम करतो. भारतानं जगाला 'सागर' चा मंत्र दिला. त्याचा अर्थ या प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि सर्वांचा विकास आहे. आयएनएस नीलगिरी चोलांच्या सागरी क्षमतेच्या बळावर समर्पित आहे. भारत विस्तारवादापेक्षा आदर्शवादाच्या विचारसरणीवर काम करतो. भारतानं नेहमीच इंडो-पॅसिफिक प्रदेशाला खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्धीसाठी पाठिंबा दिला."
पुढे पंतप्रधान म्हणाले, " भारत संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रात प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून उदयास आला आहे. गेल्या काही महिन्यांत नौदलानं शेकडो लोकांचे जीव वाचवले आहेत. तसेच हजारो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे संरक्षण केलं आहे. यामुळे संपूर्ण जगाचा भारतावरील, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलावरील विश्वास सतत वाढत आहे. भारताचे सर्वांसोबतचे आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होत आहे. १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सर्व शूरांना मी वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन दृष्टिकोन आणि सामर्थ्य दिलं. आज, आपण २१ व्या शतकातील नौदलाला त्यांच्या पवित्र भूमीवरून बळकट करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत."
The commissioning of three frontline naval combatants underscores India's unwavering commitment to building a robust and self-reliant defence sector. Watch LIVE from Mumbai. https://t.co/d1fy14qcrT
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
संपूर्ण जग हे कुटुंब आहे, असा आमचा विश्वास आहे. आम्ही 'सबका साथ सबका विश्वास' या भावनेवर विश्वास ठेवतो. त्यामुळेच आम्ही या प्रदेशाच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. जागतिक सुरक्षा, अर्थशास्त्र आणि भू-राजकारणाच्या बाबतीत 'सागरी राष्ट्र' म्हणून भारताचं मोठं योगदान असेल-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महायुतीनं विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड यश मिळाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, " पंतप्रधान मोदी मुंबईत आल्यानंतर महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधानांनी आमच्या सरकारला सतत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत आमच्या सरकारनं चांगलं काम केलं आहे. त्यामुळेच जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहं. या बहुमतामुळे आमची जबाबदारीदेखील वाढली आहे."
''आम्ही शिवसेनेच्या बैठकीत पक्षाचं संघटन आणि इतर निर्णयांवर चर्चा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही बैठकीत चर्चा केली."-एकनाथ शिंदे, मुख्य नेता, शिवसेना
भारत संरक्षण क्षेत्रात करणार जागतिक नेतृत्व- पंतप्रधान हे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांना नेव्हल डॉकयार्ड येथे देशाला आज समर्पित केले. त्यांनी मुंबई दौऱ्यापूर्वी 'एक्स' मीडियात पोस्ट करत आजचा दिवस विशेष असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "१५ जानेवारी हा दिवस आपल्या नौदल क्षमतेच्या दृष्टीनं विशेष दिवस असणार आहे. तीन आघाडीच्या नौदल लढाऊ जहाजांच्या कमिशनिंगमुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे. तसेच स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे."
हेही वाचा-