ETV Bharat / state

मध्य प्रदेशाहून आलेल्या मजुराला वाघानं केलं ठार; मृतदेह ताब्यात घेताना 'असा' घडला थरार - CHANDRAPAUR TIGER ATTACKS

जंगलात काम करत करणाऱ्या मजुराला वाघानं ठार केलं. ही घटना बल्लारपूर वनपरिक्षेत्रात मंगळवारी सकाळी घडली. या वाघाला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं.

chandrapaur Tiger attacks
डावीकडून पकडण्यात आलेला वाघ/उजवीकडे संग्रहित (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 7:36 AM IST

Updated : Jan 15, 2025, 11:53 AM IST

चंद्रपूर - मजुरीसाठी मध्य प्रदेशमधून आलेल्या मजुराला वाघानं हल्ला करून ( chandrapaur Tiger attacks ) ठार केलं. लालसिंग बरेलाल मडावी असे मृत मजुराचं नाव आहे. वाघ चाल करून येत असल्यानं मजुराचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठीदेखील वनविभागाच्या पथकाला प्रचंड प्रयत्न करावे लागले.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बल्लारपूर वनपरिक्षेत्रात सध्या बांबू कटाईचे काम सुरू आहे. याचे कंत्राट नगिन पुगलिया या व्यक्तीला देण्यात आलं. त्या अंतर्गत वनखंड क्रमांक 493 येथे मंगळवारी (ता. 14) सकाळी मजुरांच्या मदतीनं जंगलात बांबू कटाईचं काम सुरू होते. यात मध्यप्रदेश येथून आलेले लालसिंग बरेलाल मडावी (वय, 57) यांचाही समावेश होता. लालसिंग हे मध्यप्रदेश राज्यातील मणिकपुर माल (बेहराटोला) तह. बिछाया, जि. मंडला येथील रहिवासी होते. ते बांबू कटाई करत असताना वाघ त्यांच्यावर दबा धरून लपून बसला होता. अशातच अचानक वाघानं त्यांच्यावर झडप घातली. त्यांना काही समजण्यापूर्वीच ठार केले. त्यावेळी उपस्थित मजुरांनी आरडाओरडा केला. मात्र, तोवर वाघ मजुराला जंगलात घेऊन गेला. याबाबतची माहिती घटनास्थळी मजुराकडून वनविभागाला देण्यात आली.

वाघ मृतदेहाच्या बाजूला बसून राहीला- वाघानं मजुराला उचलून नेल्याची महिती मिळताच वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यावेळी मजुराचा वनविभागाच्या पथकाकडून शोध घेण्यात आला. घटनास्थळापासून काही अंतरावर मृतदेह मजुराचा मृतदेह दिसून आला. तर वाघ मृतदेहाच्या बाजूला ठाण मांडून बसला होता. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाघ वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने चाल करुन येत होता. काही तास वनविभागाचे कर्मचारी आणि वाघामध्ये हा थरार सुरू होता. अखेर सायंकाळी 4 वाजता वाघाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं.

अशी झाली थरारक कारवाई- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचलवार, शुटर अविनाश फुलझेले घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाघाला सुरक्षितरित्या गनद्वारे डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं. या वाघाची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन पिंजऱ्यात बंदिस्त केलं. पुढील तपासणीकरीता वाघाला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात त्याला हलवण्यात आलं. हा वाघ हा नर असून अंदाजे 4 वर्षाचा असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी पोडचेलवार यांनी दिली. मजुराचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला तात्पुरती सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आली. वाघाला पकडण्याची ही थरारक कारवाई उपवनसंरक्षक (मध्य चांदा वन विभाग, चंद्रपूर) श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • दुसरीकडे गोंदिया वनपरिक्षेत्रातील एका गावालगतच्या परिसरात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला, असं वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं. कोहका गावाजवळील दासगाव बीट येथे वन विभागाच्या गस्त घालणाऱ्या पथकाला T14 वाघिणीच्या नर बछड्याचा मृतदेह आढळून आला. वनाधिकाऱ्याच्या माहितीनुसार गेली काही दिवस वाघाचा बछडा आजारी होता. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बछड्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे.

हेही वाचा-

  1. व्याघ्रप्रकल्पात मोबाईलबंदीच्या निर्णयाबाबत मी अजूनही साशंक; वनमंत्री गणेश नाईक यांची स्पष्टोक्ती
  2. ताडोबा ऑनलाइन बुकिंग घोटाळा; आरोपी ठाकूर बंधूंच्या घरी ईडीची धाड

Last Updated : Jan 15, 2025, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.