नवी दिल्ली Arvind Kejriwal Lost 5 Kg Weight : दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र अटक केल्यानंतर मागील 12 दिवसात अरविंद केजरीवाल यांचं तब्बल 4.5 किलो वजन घटल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आतिशी यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांचं 12 दिवसात 4.5 किलो वजन घटल्यानं आपनं चिंता व्यक्त केली आहे. आपचे नेते संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांनी कारागृहातील इतर बंदीवानांसारखीच आपली 'सेल' साफ केल्याचंही या सूत्रांनी सांगितलं.
अरविंद केजरीवाल यांचं घटलं वजन :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली. मात्र तिहार कारागृहात अरविंद केजरीवाल यांचं वजन झपाट्यानं कमी झालं. अरविंद केजरीवाल यांचं वजन 4.5 किलो कमी झाल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आतिशी यांनी केला. अरविंद केजरीवाल यांची शूगर लेव्हल धोकादायक पद्धतीनं खाली येत आहे, असा दावाही आतिशी यांनी केला आहे.