महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बड्या नेत्यानं आईसह मुलीवर झाडल्या गोळ्या; स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या - Barnala Murder - BARNALA MURDER

Barnala Murder : पंजाबमधील बर्नालात अकाली दलाचे नेते कुलवीर सिंग यांनी आईसह मुलीची गोळ्या घालून हत्या केली. तसंच त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्यावर देखील गोळ्या झाडल्या. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर कुलवीर सिंग यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

Barnala Murder
कुलवीर सिंग यांचे कुटुंब (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 6:42 PM IST

बर्नाला (पंजाब) Barnala Murder : पंजाबमधील बर्नाला येथे अकाली दलाचे नेते कुलवीर सिंग मान यांनी आईसह मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. घरातील पाळीव कुत्र्यावरही त्यांनी गोळ्या झाडल्या. यानंतर कुलवीर सिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी कुलवीर सिंग यांच्या पत्नी घरी नव्हत्या. त्या दूध आणण्यासाठी दुकानात गेल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलवीर सिंग मान यांनी आई तसंच मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. यासोबतच त्यांनी आपल्या घरातील पाळीव कुत्र्यावरही गोळ्या झाडल्या.

परवाना असलेल्या बंदुकीतून झाडल्या गोळ्या : कुलवीर सिंग यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरनं आईसह मुलीवर गोळ्या झाडल्या. बर्नाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून कसून तपास सुरू केला. कुलबीर सिंग मान हे शिरोमणी अकाली दलाचे मोठे नेते होते. त्यांची मुलगी निम्रत कौर कॅनडामध्ये शिकत होती. ती सुट्टीसाठी पंजाबमध्ये आली होती.

पत्नी घरी नसताना झाडल्या गोळ्या : या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असलेले डीएसपी सतवीर सिंग यांनी सांगितलं की, "मृतांमध्ये कुलवीर सिंग, त्यांची मुलगी निम्रत कौर, कुलवीर सिंगची आई बलवंत कौर यांचा समावेश आहे. कुलवीर सिंह यांची पत्नी रमनदीप कौर दूध आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्या दूध घेऊन घरी परतल्यानंतर घराचे गेट आतून बंद होतं. त्यांनी कॉलनीच्या चौकीदाराला बोलावून आत जाऊन गेट उघडलं. त्यानंतर एका खोलीत कुलवीर सिंग, त्यांची मुलगी निम्रत कौर यांचे मृतदेह, तर दुसऱ्या खोलीत त्यांची आई आणि पाळीव कुत्रा आढळून आला."

मानसिक तणावातून घडली घटना : पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "घटनास्थळावरून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. ज्याचा परवाना कुलवीर सिंग यांच्या नावावर होता. प्राथमिक तपासात कुलवीर सिंग बऱ्याच काळापासून डिप्रेशनचे रुग्ण असल्याचं समोर आलं. मृताच्या पत्नीच्या जबाबाआधारे कलम 174 अन्वये कारवाई करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत."

'हे' वाचलंत का :

  1. बिहारमध्ये दीड कोटी पाण्यात, आठवड्याभरात तिसऱ्यांदा कोसळला पूल - BRIDGE COLLAPSE IN MOTIHARI
  2. 'लुटेरी दुल्हन' निघाली एचआयव्ही पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचं वातावरण - Bride HIV Positive Case
  3. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालबरोबर आज विवाह करून धर्म बदलणार का? तिच्या सासऱ्यांनी म्हटलं... - Sonakshi Sinha Wedding news

ABOUT THE AUTHOR

...view details