ETV Bharat / bharat

महाकुंभ मेळाव्यात पोहोचल्या अमेरिकेतील योग शिक्षिका, म्हणाल्या, "माझ्या देशातील इतर लोकांनाही..." - MAHAKUMBH 2025

महाकुंभ मेळाव्यात प्रयागराज येथील संगम परिसरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. त्यातच आता अमेरिकेतील योगा टीचरही मेळाव्यात पोहोचल्या आहेत.

Etv Bharat
महाकुंभ मेळाव्यात पोहोचल्या अमेरिकेतील योगा टीचर (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 11:08 AM IST

प्रयागराज : संगम शहरात 13 जानेवारीपासून दिव्य आणि भव्य असा महाकुंभ मेळावा (mahakumbh 2025) सुरू झालाय. जगभरातून भाविक इथं येत आहेत. या मेळाव्याच्या गर्दीत काही लोक भारतीय संस्कृतीनं प्रभावित होऊन इथं आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेतील 55 वर्षीय योग शिक्षिका कुशला आहेत.

काय म्हणाल्या कुशला? : 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कुशला यांनी सांगितलं की, "त्यांना सनातन धर्माविषयी खूप प्रेम आहे. त्यामुळंच त्यांनी योगशिक्षक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. ही आसक्ती त्यांना सातासमुद्रापार महाकुंभापर्यंत खेचून आणेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. प्रयागला आल्यावर त्यांनी घाटावर पोहोचून गंगा मातेला नमस्कार केला. स्वतःवर पाणी शिंपडलं. आता त्या प्रयागराजमध्ये राहून महाकुंभमेळ्याच्या साक्षीदार बनल्या आहेत."

अमेरिकेतील योगा टीचरनं त्यांचे अनुभव सांगितले (ETV Bharat)

अमेरिकेतून भारतात आलेल्या कुशला म्हणाल्या की, "मी महाकुंभबद्दल खूप ऐकलं होतं. मी वाराणसीला पोहोचले होते. तेव्हा प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं समजल्यावर मी स्वत:ला थांबवू शकले नाही. मला वाटलं की सनातन धर्माशी स्वतःला जोडण्याचा अनुभव घेण्याची ही उत्तम संधी आहे."

मी योगा टीचर आहे. माझ्या गुरूंनी मला महाकुंभमेळ्याबाबत सांगितलं होतं. काशीला पोहोचल्यावर तिथल्या लोकांनीही मला सांगितलं. मी अजून गंगेत डुबकी मारलेली नाही. पण मी स्वतःवर गंगाजल शिंपडलंय.- कुशला, योगा टीचर, अमेरिका

पुढं त्या म्हणाल्या की, "मला हिंदू धर्म खूप आवडतो. प्रयागराज हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. इथं ऋषी-मुनींचंही मोठ्या संख्येनं आगमन झालंय. अमेरिकेला पोहोचल्यानंतर मी सर्वांना सांगेन की, आयुष्यात एकदा तरी महाकुंभला जा. हा अनुभव घ्या. भारत अप्रतिम आहे, इथल्या परंपराही अतिशय आकर्षक आहेत. मी माझ्या देशातील लोकांना सांगेन की महाकुंभला जा, अन्यथा त्यांना खूप पश्चाताप होईल."

हेही वाचा -

  1. मकर संक्रातीनिमित्त आज पहिले अमृत स्नान, महाकुंभ मेळाव्यात लाखो भाविकांनी घेतला सहभाग
  2. "हर हर गंगे", महाकुंभ मेळाव्यात पौष पौर्णिमेनिमित्त भाविकांसह साधुंचा संगमावर 'भक्तिसागर'
  3. महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या नागा साधुंचा काय इतिहास आहे? जाणून घ्या, सविस्तर माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.