कोलकाता How to Buy Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरु होईल. या दौऱ्यात प्रथम T20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी इंग्लंडनं 22 डिसेंबर रोजी आपला संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरला T20 आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, 11 जानेवारी रोजी टीम इंडियाची घोषणाही करण्यात आली आहे.
A look at the Suryakumar Yadav-led squad for the T20I series against England 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nrEs1uWRos
— BCCI (@BCCI) January 11, 2025
कोलकाताला होणार पहिला सामना : या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल. सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारु शकतो.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंडमध्ये रोमांचक स्पर्धा दिसून आली आहे. दोन्ही संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 24 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात भारतानं 13 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंड संघानं 11 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर खेळताना, टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध सहा T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तर पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याची तिकिटं कुठं खरेदी करायची : दरवेळीप्रमाणे यावेळीही बुकमाय शोवर सामन्याची तिकिटं बुक करता येतील. तसंच पेटीएम इनसाइडरवरही तिकिटं उपलब्ध आहेत. या दोघांव्यतिरिक्त, झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट साईटवरही तिकिटं उपलब्ध आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी तिकिटांची किंमत किती : कोलकाता इथं होणाऱ्या पहिल्या T20 सामन्याच्या तिकिटांची मिनिमम किंमत 800 रुपयांपासून सुरु होते. यानंतर किंमत वाढतच राहील. तिकिटांची किंमत अनुक्रमे 1300 आणि 2000 रुपये ठेवण्यात आली आहे. कमाल दराबद्दल बोलायचं झालं तर, ते 2500 रुपये ठेवण्यात आलं आहे.
भारत-इंग्लंड T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा : आगामी T20 मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तुम्ही हे सामने जिओ सिनेमावर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय, स्पोर्ट्स 18 वर थेट प्रक्षेपण देखील पाहता येईल. हे सामने जिओ सिनेमाच्या वेबसाइट आणि अॅप्लिकेशनवर प्रसारित केले जातील.
हेही वाचा :