ETV Bharat / bharat

तीन मजली घराला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू, मृतात तीन मुलांचा समावेश - FIRE IN BUILDING GHAZIABAD

गाझियाबादमध्ये घराला लागलेल्या आगीत एक महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

fire broke out in three storey house in ghaziabad Uttar Pradesh
गाझियाबादमध्ये तीन मजली घराला भीषण आग (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 12:32 PM IST

नवी दिल्ली : गाझियाबादच्या (Ghaziabad Fire News) लोणी परिसरात आज (19 जाने.) पहाटे एक भीषण अपघात झाला. येथील कांचन पार्क परिसरात असलेल्या एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर (Fire Broke Out In Three Storey House) भीषण आग लागली. या घटनेत एक महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघाताचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले.

आईसह मुलांचा मृत्यू : यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी भिंत आणि छत तोडून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. या घटनेत 32 वर्षीय महिला गुलबहार, पती शाहनवाज आणि त्यांची तीन मुलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुलबहार यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झालाय. तर शाहनवाजसह इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरात शिवणकाम केलं जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कपडे असल्यानं ही आग वेगानं पसरली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी कुलिंगचं काम सुरू आहे. आगीचं कारणही तपासले जात आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

  • केमिकल फॅक्टरीला आग : यापूर्वी नोएडा येथील केमिकल फॅक्टरीत आग लागल्याची घटना समोर आली होती. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी 20 गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचा माल जळून खाक झाला होता.

हेही वाचा -

  1. लोणार ग्रामीण रुग्णालयात आग; एका रुग्णाचा होरपळून मृत्यू, बिडी ओढल्यानं आग लागल्याचा संशय
  2. मालवणला जाणारी बस आगीत जळून खाक; चालकानं समयसूचकता दाखविल्यानं ३४ प्रवाशांचे वाचले प्राण
  3. गणेश नाईकांना मंत्रिपद मिळताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडल्यानं मार्केटच्या छपराला आग; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.