कीर्ती सुरेश आणि राशी खन्नाच्या एअरपोर्ट लूकनं वेधलं नेटिझन्सचं लक्ष - Keerthy Suresh Airport look - KEERTHY SURESH AIRPORT LOOK
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 15, 2024, 12:24 PM IST
मुंबई - अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि राशि खन्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. वरुण धवनच्या बरोबर 'बेबी जॉन' या चित्रपटाचं शूटिंग करत असलेल्या कीर्ती सुरेशनं तपकिरी रंगाचा ड्रेस यावेळी परिधान केला होता. दुसरीकडे, जॉन अब्राहमच्या मद्रास कॅफेमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री राशि खन्ना हिने विमानतळावर दाखल होताच पापाराझींसह लोकांचंही लक्ष वेधून घेतलं.
तमिळ अभिनेत्री कीर्ती येत्या काही दिवसांत वरुण धवनबरोबर 'बेबी जॉन' चित्रपटामध्ये दिसणार आहे. ए कालीस्वरण दिग्दर्शित या चित्रपटात वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. राशीबद्दल सांगायचं तर, ती योद्धा चित्रपटाला मिळालेलं यश सध्या साजरं करत आहे. अलिकडेच ती 'अरनमानई 4' या तमिळ कॉमेडी-हॉरर चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तमन्ना आणि तिच्यासह इतर महत्त्वाच्या भूमिका होत्या. 3 मे रोजी रिलीज झालेला हा चित्रपट तमिळ भाषेत सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा -
हृदयविकाराच्या समस्येमुळे राखी सावंत रुग्णालयात दाखल, फोटो व्हायरल - Rakhi Sawant
संजय कपूरनं केला खुलासा, भाऊ बोनी कपूरनं कठीण काळात दिली नव्हती साथ... - sanjay kapoor
77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील प्रतिष्ठित पुरस्कार 'पाल्मे डी ओर'ची झलक व्हायरल - PALME D OR AWARD