विवेक ओबेरॉयनं घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन - Vivek and Dagdusheth Halwai Temple - VIVEK AND DAGDUSHETH HALWAI TEMPLE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 9, 2024, 1:22 PM IST
पुणे - Vivek Oberoi : सध्या गणेशोत्सव सुरू असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक हे मोठ्या संख्येनं येत आहेत. जगभरातील भाविकांसह राजकीय, सामाजिक, तसेच सिने क्षेत्रातील लोक देखील बाप्पाच्या दर्शनाला सध्या येताना दिसत आहेत. दरम्यान हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉयनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. आता त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी संवादादरम्यान विवेकनं तेथील कार्यकर्त्यांचं देखील कौतुक केलं.
विवेक ओबेरॉयनं घेतला दगडूशेठ हलवाई गणपतीचा आशीर्वाद : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीनं ट्रस्टच्या 132व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येनं भाविक गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे.