Maratha Reservation : मराठ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने तत्काळ पाऊले उचलावीत; याचिकाकर्ते विनोद पाटलांची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई Maratha Reservation : राज्य सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) दिलं आहे. मात्र जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय स्तरावर अंमलबजावणी होत नाही. जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासनानं तात्काळ पाऊले उचलावीत आणि याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात करावी, असं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी म्हटलंय. दरम्यान, जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणं आवश्यक आहे. या क्षणापासूनच सर्टिफिकेट वितरण संपूर्ण क्षमतेनं केलं पाहिजे. जे याबाबत कार्य करत नाहीत किंवा कामात दिरंगाई करतात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसदी सरकारनं घ्यावी. तसेच पोलीस भरतीचा विषय देखील ऐरणीवर आला आहे. मराठा तरुणांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मुदतवाढ द्या, ही महत्त्वपूर्ण मागणी देखील विनोद पाटील यांनी केलीय.