"तुम्हाला कंबरेत लाथ घालता येते तर आम्हालाही येते", उमेश पाटील असं का म्हणाले? - उमेश पाटील
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/03-02-2024/640-480-20660647-thumbnail-16x9-umesh-patil-on-sanjay-gaikwad.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 3, 2024, 9:23 PM IST
सोलापूर Umesh Patil On Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून वादंग उठले आहे. संजय गायकवाड यांनी 'छगन भुजबळ यांच्या कंबरेत लाथ घालू' असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना खडसावलं आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उमेश पाटील म्हणाले की, "जर तुम्हाला लाथ मारता येते. तर आम्हाला देखील वेगवेगळ्या ठिकाणी लाथा घालता येतात. संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत, शोभेल अशी भाषा वापरली पाहिजे", उमेश पाटील म्हणाले.