"आहो मास्तर, पोरगं नापास झालं..आता काय करायचं!" उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री, पाहा व्हिडिओ - Udayanraje Bhosale Mimicry - UDAYANRAJE BHOSALE MIMICRY
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 24, 2024, 7:12 AM IST
सातारा Udayanraje mimicked Nilu Phule : खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या डायलॉग आणि स्टाईलमुळं चर्चेत असतात. त्यामुळं तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. उदयनराजे स्टेजवर आले की टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. कधी ते बाईक राईड मारतात, तर कधी जीप्सी राईड मारतात. त्यांच्या कॉलर उडवण्याची स्टाईल तर फारच प्रसिद्ध आहे. त्यांचा दिलखुलास अंदाज आणि डायलॉगमुळे त्यांची नेहमीच चर्चा असते. 'एक बार जो मैने कमेंटमेंट कर दी, तो मै अपनी खुद की भी नही सुनता', हा त्यांचा डायलॉग राजकारणाच्या धुळवडीत चांगला गाजला. आता उदयनराजेंनी चक्क निळू फुलेंचीच मिमिक्री करत धमाल उडवली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघनिहाय आभार दौरा केला. कराड दक्षिणच्या दौऱ्यात त्यांनी निळू फुले यांची मिमिक्री करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावलं.