दूध दर प्रश्नी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन; पाहा व्हिडिओ - Tractor Rally for Milk Price - TRACTOR RALLY FOR MILK PRICE
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-07-2024/640-480-22024275-thumbnail-16x9-sangamner.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jul 23, 2024, 11:46 AM IST
संगमनेर Tractor Rally Agitation : दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले 18 दिवस धरणे आंदोलनास बसले असून दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गानं आपल्या मागण्यांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करतायत. याच पार्श्वभूमीवर आज (23 जुलै) कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या 55 किलोमीटर अंतरामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली यांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलय. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा, दुधाला एफआरपी आणि रिव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करावं, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीनं थांबवावी, अशा मागण्यांसाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येत आहे.