निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम! विशिष्ट थीमवर तयार केले मतदान केंद्र, पाहा व्हिडिओ - Theme Voting Center - THEME VOTING CENTER
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 19, 2024, 1:48 PM IST
नागपूर Theme Voting Center : नागपुरात निवडणूक यंत्रणेनं काही मतदान केंद्र वेगळ्या पद्धतीनं तयार केले आहेत. अशा मतदान केंद्रांना एक विशिष्ट थीम देण्यात आली असून मतदारांना वेगळ्या थीम अनुसार तयार केलेले मतदान केंद्र वेगळा अनुभव देत आहेत. नागपुरातील शंकर नगर परिसरात सरस्वती विद्यालयामधील बूथ क्रमांक 315 टेक्स्टाईल थीम नुसार सजवण्यात आलंय. नागपूर हातमागचं प्रमुख केंद्र आहे. त्यामुळं हातमागाच्या साड्या, शाली या ठिकाणी लोकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मतदान केल्यानंतर हातमागाच्या या वस्तू पाहण्याची आणि खास सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्याची संधी मतदारांना खास करुन महिला मतदारांना आकर्षित करतेय. तसंच रामटेक तालुक्यातील कट्टा येथील बांबू आणि आदिवासी थीमवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रही मतदारांना आकर्षित करत आहे.