मुंबई : फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंटनं आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांच्या चित्रपटाचे शीर्षक आणि रिलीजची तारीख घोषीत केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन हे करत असून त्याचं नाव 'लवयापा' आहे. हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट मोठ्या पडद्यावर आता धमाल करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात जुनैद आणि खुशीची जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मॉडर्न रोमँटिक-कॉमेडीला एक नवीन स्टाईल देणाऱ्या या दोन उगवत्या स्टार्सची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहण्याला मिळणार आहेत.'लवयापा' ही एक प्रेमकहाणी असणार आहे, जी खूप गुंतागुंतीची असेल. याशिवाय या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळेल.
जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर दिसणार एकत्र : 'लवयापा'ची निर्मिती दोन मोठे प्रॉडक्शन हाऊस करत असल्यानं, या चित्रपटावर अनेकांना नजरा या खिळल्या आहेत. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंट यांनी आतापर्यंत उत्तम चित्रपट निर्मित केले आहेत. खुशी कपूर आणि जुनैद खान दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत, त्यामुळे या दोघांना एकत्र पाहणे हे फार मजेशीर सर्वांसाठी असेल. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षक पाहू शकेल. या चित्रपटाची घोषणा करताना पोस्टमध्ये लिहिलं गेलं, 'परिस्थिती? संबंध? गुंतागुंतीचे प्रेम? की लवयापा? 7 तारखेला 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये भेटू.' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन खुशी आणि जुनैदला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा देत आहेत.
जुनैद खान आणि खुशी कपूरचं वर्कफ्रंट : 'लहयापा' हा 2025 मधील सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक असणार आहे. सुंदर प्रेमकथेसह जादुई प्रवासाला जाण्यासाठी आता तुम्ही कॅलेंडरमधील तारीख सेट करून ठेऊ शकता. या चित्रपटामध्ये खुशी आणि जुनैदाचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान यापूर्वी जुनैद हा 'महाराजा' या चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर शर्वरी वाघ दिसली होती. त्याचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. याशिवाय खुशी कपूर ही यापूर्वी 'द आर्चीज' या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा आणि सुहाना खानबरोबर दिसली होती. हा चित्रपट झोया अख्तरनं दिग्दर्शित केला होता.