राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सुरू असताना आरोग्य मंत्री भावुक; महाप्रसादासाठी पाठवलं 5000 लिटर तूप - राम मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 22, 2024, 6:40 PM IST
पुणे Ayodhya Ram Mandir Inauguration : गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण भारत ज्याची वाट पाहात होता त्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्या येथे पार पाडली. यावेळी अयोध्या येथे अनेक मान्यवर हे उपस्थित होते. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच पुण्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी नागरिकांसाठी अयोध्या येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यावेळी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना सुरू असताना सावंत हे भावुक झालेले पाहायला मिळाले. तसंच आज राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाप्रसाद आणि पूजेसाठी वापरण्यात आलेलं 5000 लिटर तूप हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पाठवलं आहे, याबाबतची माहिती सावंत यांनी दिली आहे.