सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंचा उद्धव ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा; नेमकं काय म्हणाले? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 20, 2024, 1:04 PM IST
|Updated : Nov 20, 2024, 2:02 PM IST
सोलापूर : सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) झटका दिलाय. तसंच अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केलय. त्यामुळं शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. आज मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, शिवसेनेनं (उबाठा) गडबड केली आणि हा मतदार संघ स्वतःकडं ठेवला", असं ते म्हणाले. तसंच दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर यासंदर्भात बोलताना प्रणिती शिंदेनी ठाकरेंना टोला लगावला. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. ही लढत देखील तशीच आहे. मात्र, काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देऊन आम्ही महाआघाडीचा धर्म पाळला." तसंच 'जो जीता वही सिकंदर' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय. यामुळं आता उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले आहेत.