राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 1, 2024, 6:15 PM IST
पालघर Seized One Crore Liquor : मद्य तस्करांकडून मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महाराष्ट्रात विक्रीस आणि वाहतुकीस बंदी असलेलं दादरा नगर हवेली बनावटीचं मद्य बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकानं धडक कारवाई करत जवळपास एक करोडांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील एका जकात नाक्यावर ही कारवाई केलीय. या कारवाईत मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह एक ट्रक जप्त केला असून तीन आरोपींना अटक केलीय. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज खान यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत 700 हून अधिक महागड्या मद्याचे बॉक्स जप्त केले आहेत.