पोर्शे अपघाताला ६ महिने पूर्ण; तरुणाईची एक मेणबत्ती पेटवून आदरांजली - PORSCHE CRASH CASE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 17, 2024, 10:51 PM IST
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात श्रीमंत अल्पवयीन कारचालकाने, भरधाव आलिशान पोर्शे कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक देऊन त्यांचा जीव घेतला होता. या घटनेला आज (दि. १८ नोव्हेंबर) सहा महिने पुर्ण झाली. हे प्रकरण पुण्यासाठी आणि पुणे पोलिसांसाठी महत्वाचं ठरलं होतं. नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज, मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणं, यासह पैशांच्या जोरावर आणि राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्त बदल केल्यामुळं राज्यभरात हे प्रकरण चांगलच गाजल होतं. पोलिसांनी अत्यंत तळमळीनं या प्रकरणाचा तपास करून मुलाचे आई-वडिल, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एक कामगार तसेच रक्त बदलात मदत करणारे अशा सर्वांना अटक केली होती. दरम्यान, या घटनेला ६ महिने पुर्ण झाल्यानं, या अपघातात जीव गमावलेल्या अनिश आणि अश्विनी यांना आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने अपघात स्थळी "एक मेणबत्ती पेटवून" त्यांना आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे, राजकीय धामधूमित राजकीय पक्ष विरहीत ही आदरांजली वाहण्यात आली.