श्रीकांत शिंदे यांची विक्रमी मतांनी हॅट्रिक निश्चित; मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 6, 2024, 10:37 PM IST
रत्नागिरी Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha Constituency) मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच कल्याण लोकसभेतून महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज केलीय. यामुळं आता कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत असेल हे स्पष्ट झालंय. रत्नागिरी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी जिंकून येतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आम्ही कामाला लागलो आहोत. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.