हिंदुत्वाचा विचार आहे, तर भाजपा, संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत या; ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंची भावनिक साद - Uddhav Thackarey - UDDHAV THACKAREY
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 17, 2024, 4:46 PM IST
ठाणे Uddhav Thackarey in Thane : "पक्ष विकणारे जे आहेत त्यांच्या नादी तुम्ही लागू नका, हिंदुत्वाचा विचार आहे तर अस्सल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत या," अशी भावनिक साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत भाजपाच्या कार्यकर्त्यांना घातलीय. शिवसेना तथा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी ही साद घातलीय. भाजपाची आज जी अवस्था झालीय, ती भाजपाच्या अस्सल कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का? भाजपामधील निष्ठावंत कुठं आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेला नकली म्हणतात, आता तुमचा पक्ष नकली झाला असून त्यांच्या पक्षात आयात आणि भाडोत्री कार्यकर्त्यांचा भरणा झाल्याचं टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील जाहीर सभेत भाजपावर सोडलं.