अडसूळ विरुद्ध राणा कुटुंबातील वाद चिघळण्याची शक्यता; कॅप्टन अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - Navneet Rana vs Anandrao Adsul - NAVNEET RANA VS ANANDRAO ADSUL
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 10, 2024, 3:47 PM IST
नागपूर : राज्यपालपदी वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेले आनंदराव अडसूळ आणि कॅप्टन अभिजित अडसूळ हे वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू असताना आज कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी संदर्भात अभिजित अडसूळ यांना विचारलं असता ते म्हणाले, "ही सदिच्छा भेट होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राणा दाम्पत्याकडून आमच्यावर जे आरोप आणि प्रत्यारोप झाले त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. राणा दाम्पत्य महायुतीत नकोत या मागणीवर मी कायम आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक मतदारसंघावर आमचा दावा आहे. बडनेरा, दर्यापूर आणि तिवसा या जागा शिवसेनेने लढवल्या होत्या. त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत."