लेकाच्या लग्न सोहळ्यात आमदार संजय गायकवाड तुफान नाचले... पाहा व्हिडिओ - sanjay gaikwad dance - SANJAY GAIKWAD DANCE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 10:37 PM IST

बुलढाणा Sanjay Gaikwad Dance : बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या मुलाचा विवाह सोहळा (Marriage Ceremony) आज सायंकाळी पारंपरिक पद्धतीने झाला. या लग्न समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, आमदार देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिले. मोठ्या धुमधडाक्यात हा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यातील संगीत समारोह मंगळवारी सायंकाळी पार पडला. एरवी आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं परिचित असलेले आमदार संजय गायकवाड यांनी, या संगीत सोहळ्यात आपल्या कुटुंबासह झिंगाट गाण्यावर चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी आमदार गायकवाड यांना गीत गाण्याचा मोह आवरला नसल्यानं, नागरिकांना त्यांच्यातील गायक देखील अनुभवता आला.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.