"धनंजय मुंडे यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणेंना पंकजांच्या विरोधात उभं केलं" - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 25, 2024, 10:59 PM IST
बीड Beed Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा मतदार संघातील लढत (Beed Lok Sabha constituency) तिरंगी आहे. मात्र, ही तिरंगी लढत नाही. यातील महाविकास आघाडीचा उमेदवार डमी आहे, असा आरोप रेखा ठाकूर यांनी केलाय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांच्याविरोधात डमी उमेदवार म्हणून उभं केल्याचा आरोप वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर (Rekha Thakur)यांनी केलाय. जरी बजरंग सोनवणे निवडून आले तरी ते दिल्लीत जाऊन भाजपच्या बाजूने बसतील असंही त्या म्हणाल्या. बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना रेखा ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.