राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा : बोरांपासून साकारली प्रभू श्रीरामाची प्रतिकृती - बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/21-01-2024/640-480-20560306-thumbnail-16x9-ram-mandir-ayodhya.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 21, 2024, 1:45 PM IST
नाशिक Ram Mandir Ayodhya : कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा काही तासांनी आयोध्येत दिमाखदार तेवढ्याच पवित्र, धार्मिक वातावरणात पार पडणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे. रामायणातील शबरीमातेची रामभक्ती आणि उष्टी बोरं ही गोष्ट सर्वसृत आहे. बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना चांदवड तालुक्यातील भाटगाव हायस्कूलचे कलाशिक्षक देव हिरे यांना सूचली. आयोध्या इथं प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी 8 बाय 8 फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे. श्रीरामाची प्रतिकृती साकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी 'जय श्री राम'चा जयघोष केला आहे.
या प्रयोगासाठी साठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचं आवाहन मुख्याध्यापक विजय सानप आणि पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी केलं. अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली. विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कलाशिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत प्रेरित केलं. तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणं वर्गीकरण करत तब्बल 16 तास कला अन् भक्तीचा संगम ही कलाकृती ठरली. कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा अन् श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता. बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीनं साकारलेली श्री रामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला, अशी प्रतिक्रिया कला क्षेत्रातून उमटली आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कलाकृती बघण्यासाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी होत आहे.