आमदार दिलीप मोहिते पाटील राजकीय दबाव टाकत पुतण्यावर पांघरातायेत शाल; स्थानिक नागरिकांचा आरोप, मोहिते पाटील म्हणाले.... - Pune Accident News - PUNE ACCIDENT NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 23, 2024, 3:34 PM IST
पुणे Pune Accident News : पुणे अॅड हिट प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा भीषण अपघातान पुणे जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरेजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ओम भालेराव (वय १९ वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर मयुर मोहिते असं आमदार मोहिते यांच्या पुतण्याचं नाव आहे.