पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना पाचाड येथील लॉजिंगमधून पहाटे अटक, पाहा सीसीटीव्ही फुटेज - Manorama Khedkar arrested - MANORAMA KHEDKAR ARRESTED
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-07-2024/640-480-21982868-thumbnail-16x9-pushpa.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jul 18, 2024, 3:16 PM IST
पुणे / रायगड ( महाड ) - Manorama Khedkar arrested : पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासह अन्य लोकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं पाचाड येथील एका घरगुती लॉजिंगमधून ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी नऊ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आली.
मनोरमा खेडकर यांना रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील पार्वती निवास या घरगुती लॉजिंगमधून पहाटे साडेसहाच्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक करण्यात आलं होतं. बुधवारी रात्री 10 च्या सुमारास मनोरमा खेडकर या पार्वती निवास इथं राहायला आल्या, अशी नोंद लॉजिंगच्या रजिस्ट्ररमध्ये करण्यात आल्याची माहिती अनंत औकीरकर, हॉटेल मालक, पाचाड - महाड यांनी दिली आहे. यावेळी मनोरमा खेडकर यांना पोलीस अटक करुन घेऊन जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ठ दिसत आहे.
हेही वाचा -