गिरणा नदीच्या पात्रात अडकलेल्या 12 लोकांना हेलिकॉप्टच्या सहाय्यानं दिल जीवदान - Malegaon Rescue Operation - MALEGAON RESCUE OPERATION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 5, 2024, 3:24 PM IST
मालेगाव Malegaon Rescue Operation : नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. (Nashik Rain) मालेगावच्या गिरणा नदीला (Girna River) आलेल्या पुराच्या पाण्यात गेल्या 20 तासापासून अडकलेले 12 लोक सुखरूप आहेत. सर्वजण एका खडकावर बसून असल्यामुळं पुराचं पाणी त्यांच्यापर्यंत पोहचलं नाही. त्यांना वाचवण्यासाठी आज हेलिकॉप्टरची (Helicopter) मदत घेण्यात आली. त्यामुळं त्यांच्यासह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेलिकॉप्टरच्या मार्फत रेस्क्यू ऑपरेशन : पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी एसडीआरएफची टीम, अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. पुराचं पाणी ओसरताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. दरम्यान मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली.