लग्नाळू मुलांना उमेदवाराचं अनोखं आश्वासन! "आमदार झालो तर..." - PARLI ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 6, 2024, 11:41 AM IST
बीड- जिल्ह्यात विधानसभा निवडणुक रंगतदार होताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांचे लग्न होत नाहीत. मिळेल त्या कामावर या भागात आपली उपजीविका भागवतात. या भागात एमआयडीसीची जागा आरक्षित करूनदेखील या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. बीड जिल्ह्यात अनेक मंत्रीपदे आली आहेत. मात्र, एकही उद्योग व्यवसाय आला नाही. परळी मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे. रात्री या प्रचा यात्रेचा शुभारंभ परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे झाला. त्या ठिकाणी जमलेल्या शेकडो तरुणांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आश्वासन दिले. " मी आमदार झालो तर तुम्हा सर्वांचे लग्न करून देईल. कारण या भागात उद्योग व्यवसाय मी घेऊन येईल. तुमच्या हाताला काम देईल. तुमचे लग्न करेल असे आश्वासन दिल्यामुळे तरुणांमध्ये एकच हशा पाहायला मिळाला. मात्र, यानिमित्ताने स्थानिक भागातील बेरोजगारीची समस्या समोर आली आहे.