'आंतरराष्ट्रीय योग दिवस': 1200 विद्यार्थ्यांनी मेडिकल सिम्बॉलमध्ये मानवी साखळी तयार करत केली योग प्रात्यक्षिकं - International Yoga Day - INTERNATIONAL YOGA DAY
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 21, 2024, 12:25 PM IST
संगमनेर International Yoga Day: तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री संस्थेचे डी .के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योगदिन' साजरा करण्यात आला. विद्यालयात 1200 विद्यार्थ्यानी मेडिकल सिम्बॉलमध्ये मानवी साखळी तयार करत योगाची प्रात्यक्षिकं केली. मानवाला आजारापासून दूर आणि सशक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे औषध घ्यावे लागतात. दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. नियमित योगासने केल्यास मानवाचं शरीर सशक्त लवचिक आणि बलवान बनतं. याचाच प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिम्बॉलच्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिकं केली. जगभरात आज १० वा 'आंतरराष्ट्रीय योग' दिवस साजरा केला जातोय. योगसाधनेचं मुळ उगमस्थान भारत आहे. सैनिकापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आज उत्साहाने योग दिवस साजरा करत आहेत.