मतदानासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी; 1,434 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान
🎬 Watch Now: Feature Video
नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 1,434 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात 69 मतदानकेंद्र मोबाईल नेटवर्क नसलेली, तर 723 मतदान केंद्र ही वेबकॉस्टींगची असणार आहेत. अक्कलकुवा मतदार संघातील मणिबेली, चिमलखेडी, बामणी, मुखडी, डनेल हे पाच मतदान केंद्र अतिदुर्गम भागात असल्यानं त्या ठिकाणी मतदान कर्मचारी मतदान यंत्र घेऊन रवाना होणार आहेत. तसंच इतर मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी कर्मचार्यांसाठी 645 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा मानस आहे. प्रत्येक मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून आमचे कर्मचारी दुर्गम भागात पोहोचतील. निवडणूक काळात जिल्हाभरात केलेल्या कारवाईत सुमारे 4 कोटी 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली आहे.