निवासी डॉक्टर आजपासून संपावर, लेखी आश्वासन दिल्यानंतरच संप मागे घेणार - शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 22, 2024, 10:18 PM IST
पुणे Resident Doctors Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या तीन प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून संप पुकारला आहे. त्यामुळं रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडं निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक बोलावली आहे. मार्ड डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून केंद्रीय मार्ड असोसिएशनच्या मागण्यांबाबत 7 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली नसल्यानं त्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होणार असल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आमचा संप सुरूच राहणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासनं दिली गेली. त्यामुळे आता लेखी दिल्यानंतरच संप मागे घेऊ. तसंच अत्यवश्यक रुग्णसेवा सुरूच राहणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.