दुपारी 12 पर्यंतच्या निकालामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मुसंडी - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 4, 2024, 2:06 PM IST
मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या फेऱ्या पाहता राज्यात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत आहे. तर महायुतीला केवळ आतापर्यंत 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यात बऱ्यापैकी प्रचार केला आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला; मात्र याचा फायदा महायुतीला होईल असं दिसत असताना त्याचा फायदा महायुतीला झाला नाही. शिवाय स्वतः वंचितलाही लोकांनी नाकारल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच दुपारी 12 पर्यंतच्या निकालांची राज्यातील स्थिती काय आहे जाणून घेऊया.
वडेट्टीवार यांचा दावा : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेणार, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 3 जून, 2024 रोजी केली. राज्यातील ३५ जागांसह विदर्भातील दहावर महाविकास आघाडी विजयी होणार असा विश्वासही व्यक्त केला. गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.